Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी

Matheran Mini Train News: माथेरानमध्ये मिनी ट्रेनच्या सध्या केवळ दोनच फेऱ्या सुरू आहेत. यामुळे वाढत्या पर्यटकांना मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यात अडचणी येत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 31, 2026 | 01:53 PM
Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी; पर्यटन हंगामात पर्यटकांची वाढती गर्दी
  • नेरळ-माथेरान मिनी ट्रेनमध्ये केवळ दोनच फेऱ्या; पर्यटकांचा हिरमोड
  • माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण; अधिक फेऱ्यांसाठी मागणी वाढली
माथेरान: ब्रिटिश काळापासून सुरू असलेली नेरळ-माथेरान नेरळ ‘मिनी ट्रेन आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी समजली जाते. या ट्रेनची संख्या गेल्या दोन वर्षापासून कायम असल्याने पर्यटकांना ‘मिनी ट्रेन’ मधून प्रवास करता येत नाही. त्याचवेळी या मार्गावर पूर्वी चार ते पाच गाड्या चालवल्या जायच्या. आता मात्र मिनी ट्रेनच्या दोनच फेऱ्या नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर सुरू आहेत. दरम्यान, शाळांना सुट्टया पडल्यानंतर माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होत असतो. त्यामुळे पुढील दोन अडीच महिने नेरळ-माथेरान नेरळ मार्गावर अधिकच्या फेऱ्या व्हाव्यात, अशी मागणी पर्यटक आणि माथेरान मधील व्यावसायिक करीत आहेत.

मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी

माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांना मिनी ट्रेनच्या प्रवासाची आस लागलेली असते. ब्रिटिश काळात नेरळ-माथेरान नेरळ हा नॅरो गेज मार्ग शोधून काढण्यात आला. त्यानंतर पावसाळा वगळता अन्य प्रत्येक हंगामात नेरळ-माथेरान नेरळ मिनीट्रेनच्या चार ते पाच फेऱ्या होत होत्या. त्यात नेरळ येथून माथेरानसाठी दुपारच्या वेळी देखील मिनी ट्रेन सोडण्यात येत होती. २००८ मध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर मिनी ट्रेनच्या वाहतुकीला ग्रहण लागले आणि आजतगत नेरळ माथेरान नेरळ मार्गावर मिनी ट्रेनच्या पूर्ण क्षमतेने फेऱ्या होत नाहीत.

आमचा व्यवसाय मिनीट्रेनवर चालतो. मात्र केवळ दोनच फेऱ्या असल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो. किमान चार गाड्या चालवाव्या आणि त्यातील एक गाडी वस्तीची असावी. त्यासाठी इंजिन नेरळ लोको येथे उपलब्ध असून त्याचा वापर करून पर्यटन हंगामात दिलासा देण्याचा निर्णय रेल्वेने घ्यावा.- गिरीश पवार, तज्ज्ञ संचालक, माथेरान नागरी पतसंस्था

Mumbai News: हुक्का फ्लेवर ‘खाद्यपदार्थ’ कसा? एफडीएच्या अजब कारवाईमुळे राज्य सरकारवर ओढवली नामुष्की

२०० प्रवाशांचाच प्रवास

प्रवासी पर्यटकांची संख्या वाढत असून पर्यटक हे नेरळ स्थानकात मिनी ट्रेनच्या तिकीटीसाठी तासंतास बसून राहतात. मात्र नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर केवळ दोनच फेऱ्या चालवल्या जात असल्याने जेमतेम २०० प्रवाशांना प्रवास करता येतो. त्यामुळे पर्यटकांकडून मिनी ट्रेनची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे माथेरानमधील व्यवसाय हा नेरळ-माथेरान नेरळ मिनी ट्रेनच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे व्यावसायिक देखील नेरळ-माथेरान नेरळ मार्गावर अधिकच्या फेऱ्या व्हाव्यात यासाठी सातत्याने आग्रही असतो. नेरळ माथेरान मार्गावर सायंकाळी पाच वाजता सोडली जाणारी मिनी ट्रेन चालवण्यात यावीत, ही मागणी रेल्वेने पूर्ण करावी असे त्यांचे म्हणणे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Demand rises for more matheran hill railway trips as tourist season begins in matheran raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Marathi News
  • Matheran
  • raigad

संबंधित बातम्या

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
1

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
2

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
3

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
4

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.