Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: दिघी बंदर विस्ताराला स्थानिकांचा तीव्र विरोध; पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेवर प्रश्न

श्रीवर्धन तालुक्यातील प्रस्तावित दिघी बंदर विस्तार प्रकल्पावर झालेल्या जनसुनावणीत स्थानिक नागरिकांनी पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेच्या मुद्द्यांवर तीव्र आक्षेप नोंदवले. आदिवासी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर स्थानिकांचा आक्षेप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2026 | 01:52 PM
Raigad News: दिघी बंदर विस्ताराला स्थानिकांचा तीव्र विरोध; पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेवर प्रश्न

Raigad News: दिघी बंदर विस्ताराला स्थानिकांचा तीव्र विरोध; पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेवर प्रश्न

Follow Us
Follow Us:
  • दिघी बंदराच्या प्रस्तावित विस्ताराला स्थानिकांनी पर्यावरणाच्या संभाव्य हानीमुळे तीव्र विरोध दर्शवला आहे.
  • सुमारे ६० दशलक्ष घनमीटर ड्रेजिंगमुळे समुद्री जैवविविधता आणि मच्छीमारांच्या पारंपरिक उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
  • प्रकल्पातून रोजगारनिर्मितीचे आश्वासन असले तरी स्थानिक तरुणांना प्रत्यक्ष किती रोजगार मिळणार, याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिघी: श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या प्रस्तावित विस्तार प्रकल्पासाठी झालेल्या जनसुनावणीत स्थानिक नागरिकांनी पर्यावरण, रोजगार आणि आदिवासींच्या प्रश्नांवरून तीव्र आक्षेप नोंदविले. सुमारे १४० एमएमटीपीए क्षमतेच्या दिघी बंदर विस्ताराचा प्रस्ताव असून, प्रकल्पाच्या आराखड्यात मोठ्या प्रमाणात भराव (रिक्लेमेशन), ड्रेजिंग आणि सागरी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभाव अहवालात पर्यावरण व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यात सुमारे ६९ हेक्टर हरित पट्टा विकसित करण्याचे तसेच पर्यावरण नियंत्रणासाठी खर्च प्रस्तावित असल्याचे नमूद आहे. मात्र, जनसुनावणीत स्थानिकांनी या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करण्याऐवजी प्रत्यक्ष जमिनीवरील आणि समुद्री पर्यावरणावरील परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Chandrapur News: धाबा परिसरात मादी बिबट्या आणि पिल्लाचा वावर; 125 वनकर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू

दिघीला भकास करणारा प्रकल्प नको

ॲड. रामचंद्र मैदाडकर यांनी प्रकल्पाच्या विकासाला विरोध करत, दिघीला भकास करणारा प्रकल्प नको. आतापर्यंत स्थानिकांना रोजगार मिळालेला नाही. प्रस्तावित रिक्लेमेशनमुळे पर्यावरणाची हानी होऊन प्रजननस्थळे नष्ट होण्याचा धोका आहे. सर्वेक्षण न करताच प्रकल्प अहवाल तयार करण्यात आल्याचा आमचा आक्षेप आहे, अशी भूमिका मांडली. संतोष गिते यांनी दिधी परिसर हा आदिवासीबहुल असल्याकडे लक्ष वेधत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, अशी मागणी केली. ही लढाई मोठी आहे. नागरिकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक प्रश्नांसाठी आंदोलनाची भूमिकाही स्पष्ट केली.  (फोटो सौजन्य – AI Created) 

आरोग्यावर १३९ लाख खर्च

प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीचे आश्वासन देण्यात आले असून अहवालानुसार स्थानिकांना प्राधान्य देत सुमारे ५०० प्रत्यक्ष आणि २,५०० अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पाचा फायदा स्थानिक तरुणांना प्रत्यक्षात किती मिळणार?, जनसुनावणीत आरोग्यावर १३९ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा केला. मात्र याबाबत प्रत्यक्षात खर्च न झालेल्या बाबी अहवालात दाखवून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

उपजीविका सुरक्षित ठेवूनच प्रकल्प राबवावा

दिघी बंदर विस्तारामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रेजिंग आणि भरावाची कामे प्रस्तावित आहेत. अहवालानुसार प्रस्तावित आराखड्यासाठी सुमारे ६० दशलक्ष घनमीटर ड्रेजिंग प्रस्तावित आहे. त्यामुळे समुद्री जैवविविधता, मच्छीमारांचे जीवनमान आणि पारंपरिक उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. विकासाला विरोध नाही; मात्र स्थानिकांचा रोजगार, पर्यावरण, आरोग्य आणि उपजीविका सुरक्षित ठेवूनच प्रकल्प सचवावा, अशी भूमिका जनसुनावणीत अनेक नागरिकांनी मांडली. त्यामुळे दिघी पोर्ट विस्तार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढत असून, प्रशासन या हरकतींची कशा पद्धतीने दखल घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Dighi port expansion project faces local opposition over environment jobs and livelihood concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
1

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.
2

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा
3

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा

National News : कॅप्टन स्मित मच्छार यांना मॅनकाइंड फार्माकडून १ कोटींचे बक्षीस; धैर्य आणि संयमाचा सन्मान
4

National News : कॅप्टन स्मित मच्छार यांना मॅनकाइंड फार्माकडून १ कोटींचे बक्षीस; धैर्य आणि संयमाचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.