Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर उतरले रस्त्यावर; एक दिवसीय धरणे आंदोलनात 2000 हून नागरिकांच्या सह्या

Karjat News : येऊ घातलेले टोरंट जलविद्युत,पोशीर आणि शिलार या धरणांच्या विरोधात येथील पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर उतरले होते.या एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी कर्जत तालुका रस्त्यावर उतरलेला दिसून आला,किमान 2000 कर्जतकर यांनी सह्या करून विरोध दर्शवला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 18, 2026 | 07:43 PM
Karjat News : पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर उतरले रस्त्यावर; एक दिवसीय धरणे आंदोलनात 2000 हून नागरिकांच्या सह्या
Follow Us
Close
Follow Us:
  • पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर उतरले रस्त्यावर
  • एक दिवसीय धरणे आंदोलनात 2000 हून नागरिकांच्या सह्या
कर्जत/संतोष पेरणे : येऊ घातलेले टोरंट जलविद्युत,पोशीर आणि शिलार या धरणांच्या विरोधात येथील पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर उतरले होते.या एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी कर्जत तालुका रस्त्यावर उतरलेला दिसून आला,किमान 2000 कर्जतकर यांनी सह्या करून विरोध दर्शवला.

टोरंट वीज प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरण यामुळे होणारे पर्यावरण नुकसान आणि कर्जतचे हरितपण अबाधित ठेवण्यासाठी कर्जत बचाव समिती कार्य करीत आहे. या समितीच्या माध्यमातून आज कर्जत येथे लोकमान्य टिळक चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. टोरेंट’ प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा विनाश होणार आहे. टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित 932 एकर प्रकल्पावर आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतला. यातील 600 एकर जागा ही थेट घनदाट वनविभागाची आहे. पश्चिम घाटातील हा अत्यंत संवेदनशील क्षेत्र असून, येथे लाखो झाडे तोडली जाणार आहेत, ज्यामुळे येथील वन्यजीव आणि वनस्पती धोक्यात येतील. भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याला गेल्या 20 वर्षांपासून वनविभागाकडून मंजुरी मिळत नव्हती, मग खाजगी टोरेंट कंपनीसाठी वनविभागाने तातडीने ‘रेड कार्पेट’ कसे अंथरले? असा थेट सवाल आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. तसेच हायटेन्शन वीज वाहिन्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असून भविष्यात त्यांच्या जमिनींचे मूल्य कमालीचे घटणार आहे.

Raigad News: उकाड्यामुळे ग्राहक घरातच; महाड बाजारपेठेतील वर्दळ घटली, व्यापारी चिंतेत

कर्जत वाचवण्यासाठी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. कैलास मोरे यांच्या मदतीला जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे तसेच राजकारण विरहित समितीचे कार्यकर्ते बाजीराव दळवी,रंजन दातार,राजाभाई कोठारी,उमेश गायकवाड,ॲड योगेश देशमुख, कृष्णा जाधव,सचिन गायकवाड, मालू निरगुडा,जितरत्न जाधव,नॅन्सी गायकवाड,बंडू तुरडे, पप्पू देशमुख,राजाराम शेळके,रामदास घरत,अनिल वाघमारे, स्विटी बार्शी, सरपंच वाघमारे आदीसह अनेक कार्यकर्ते शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी ॲड कैलास मोरे यांनी प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका केली. तालुक्यात ब्रिटिशाकालीन पळसधरी डॅम, 31 वर्षांपासून रखडलेला पाली-भूतवली डॅम, आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कोंढाणा धरण यांसारखे मोठे प्रकल्प आहेत. याशिवाय पोशीर आणि शिलार तसेच टोरेंट कंपनीचे दोन मोठे पंप स्टोरेज प्रोजेक्ट असे मिळून तालुक्यात तब्बल 9 धरणे उभी राहत आहेत. मात्र, या सर्व धरणांमधील पाण्याचा 1 टक्काही वाटा स्थानिक कर्जतकरांच्या नशिबी नाही. कोंढाणा आणि पोशीर-शिलारचे सर्व पाणी थेट मुंबई आणि नवी मुंबई महानगर क्षेत्रासाठी वळवले जात असून, स्थानिक शेतकरी आणि नागरिक मात्र पाण्याच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान कर्जतचा निसर्ग आणि हिरवळ पाहण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक येथे येतात. येथील भूमिपुत्रांनी उभारलेल्या रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसच्या माध्यमातून हजारो स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, हीच नैसर्गिक हिरवळ उध्वस्त करून सरकार येथे खाजगी कंपन्यांचे प्रकल्प लादत आहे. हा सर्वात मोठा विनोद आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. तर हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या क्रांतीचा इतिहास लाभलेल्या कर्जत तालुक्यात केवळ व्हॉट्सॲपवर चर्चा करून चालणार नाही, तर रस्त्यावर उतरून लढावे लागेल. हे आंदोलन यशस्वी होवो वा न होवो, पण जेव्हा पुढची पिढी विचारेल की कर्जतचा ऱ्हास होत असताना तुम्ही काय करत होता? तेव्हा आम्ही छाती ठोकून सांगू शकू की आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवला होता, असा निर्धार एक दिवसीय आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी बोलून दाखवला.

तहसीलदार आंदोलन स्थळी
कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव हे यावेळी सायंकाळी आंदोलन स्थळी पोहचले.तेथे सर्व आंदोलक यांनी शासनाने मध्यस्थी करून टोरंट प्रकल्पाचे सुरू असलेली सर्व कामे थांबवावी अशी मागणी केली आहे.आदिवासी लोकांच्या जमिनीत घुसखोरी,आदिवासी लोक आणि तेथील ग्रामपंचायत वर लादलेली हुकूमशाही यामुळे आधी ते वाद मिटवावेत आणि नंतरच शेतकरी स्थानिक यांचे समाधान झाल्यानंतर आंदोलन करण्याची मागणी केली.

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय

निर्णय
पावसाळी अधिवेशन काळात मुंबई पायी मोर्चा…
पाच जून रोजी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नसल्याने पाच जून या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी एक झाड लावावे आणि आपले तालुक्यात वन संपदा वाढवावी असा निर्णय घेण्यात आला.तर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल त्यावेळी पायी मोर्चा कर्जत पासून काढला जाईल असे जाहीर करण्यात आले.

Web Title: Karjat news karjatkars take to the streets to save the environment over 2000 citizens sign a one day protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Parbhani : परभणी हिंगोलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
2

Parbhani : परभणी हिंगोलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!
3

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!
4

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.