Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा

रायगड जिल्ह्यातील किहीम ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याज फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू झालेल्या संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्रामुळे गावात शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट, स्वच्छ परिसर आणि शाश्वत विकासाला मोठी मदत होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2026 | 01:56 PM
Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा

Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा

Follow Us
Follow Us:
  • किहीम ग्रामपंचायत आणि याज फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
  • ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे प्रक्रिया करून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.
  • हा प्रकल्प ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
अलिबाग: ग्रामीण भागात शाश्वत कचरा व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने किहीम ग्रामपंचायतीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. किहीम ग्रामपंचायत आणि याज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले, या प्रकल्पामुळे गावातील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, स्वच्छ परिसर, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Yavatmal News: अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शून्य? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मिठाई साठवणुकीची जुनीच पद्धत

या केंद्राचे उद्घाटन पिनाकीन पटेल यांच्या हस्ते झाले. किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद ऊर्फ पिंट्या गायकवाड यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत आणि याज फाऊंडेशन यांच्या समन्वयातून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे. याज फाऊंडेशनचे भटू सावंत यावेळी उपस्थित होते. या केंद्रामध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, मोकळ्या जागेत कचरा टाकण्याच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

प्लास्टिकसह पुनर्वापरयोग्य वस्तूंचे योग्य व्यवस्थापन होऊन संसाधनांचा पुनर्वापर वाढण्यास हातभार लागणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, याज फाऊंडेशनचे प्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. किहीम ग्रामपंचायत आणि याज फाऊंडेशन यांच्या या संयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत, गावाला अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणारा प्रकल्प

सामाजिक स्तरावर हा उपक्रम स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणारा ठरणार आहे. कचऱ्याचे जागेवरच वर्गीकरण, स्वच्छ परिसराची जबाबदारी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कचरा व्यवस्थापन ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.

पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासचा समतोल

भविष्यात किहीममधील हा प्रकल्प आदर्श मानून परिसरातील इतर ग्रामपंचायतीमध्येही अशा प्रकारचे संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट

किहीम परिसराच्या स्वच्छ प्रतिमेला बळ मिळणार!

पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्वपूर्ण मानला जात आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याशिवाय अनियंत्रित कचऱ्यामुळे भटक्या जनावरांना, पक्ष्यांना आणि सागरी पर्यावरणाला होणारा धोका कमी करण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या किहीमच्या स्वच्छ प्रतिमेला या प्रकल्पामुळे अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Kihim gram panchayat inaugurates joint waste management centre with yaj foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Alibag
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव
1

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव

आरबीआयची योजना सुपरहिट! अवघ्या ४२ दिवसांत भारतात १७.४१ अब्ज डॉलर्स जमा
2

आरबीआयची योजना सुपरहिट! अवघ्या ४२ दिवसांत भारतात १७.४१ अब्ज डॉलर्स जमा

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
3

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
4

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.