Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर

महाड शहरावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. या संकटावर मात करण्याची आणि ठोस नियोजन करण्याची गरज महाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2026 | 02:40 PM
Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर

Follow Us
Follow Us:
  • सावित्री नदीपात्रातील जलवाहिनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुरात वाहून गेल्याने नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान
  • पाण्याची गळती, धरणांतील घटता साठा, पाणीपुरवठ्याचे नियोजन, विविध नागरी प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले
  • पाणीटंचाईच्या काळात नवीन बांधकामांना नळजोडण्या देताना सावध भूमिका घ्यावी
महाड: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाड शहरावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना त्यावर मात करण्यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करण्याची गरज शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या महाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त करण्यात आली.

पाण्याची गळती, धरणांतील घटता साठा, पाणीपुरवठ्याचे नियोजन, थकीत करांची वसुली, निकृष्ट रस्ते, नगरपरिषदेच्या वीजजोडणीचा कथित अनधिकृत वापर आणि शहरातील बॅनरबाजी अशा विविध नागरी प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष संदीप जाधव, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.

कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा

काही महिन्यांपूर्वी सावित्री नदीपात्रातील जलवाहिनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुरात वाहून गेल्याने नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला असून, त्याची बिलेही अद्याप थकीत आहेत. या प्रकरणात संबंधितांकडून नुकसानभरपाई मिळविण्यासाठी नगराध्यक्षांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी वजीर कोंडीवकर यांनी केली, तर पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केली.  (फोटो सौजन्य – AI Created)

यापूर्वी रासायनिक प्रदूषणामुळे वापर बंद केलेल्या शेडाव डोहातील पाण्याचे नमुने तपासून त्याचा वापर करणे शक्य आहे का, याची पडताळणी करावी, असेही त्यांनी सुचविले. कुर्ले धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० दिवसांनी, तर कोथुर्डे धरणातील जवळपास दोन महिन्यांनी कमी असल्याचे वजीर कोंडीवकर यांनी निदर्शनास आणले. कोथुर्डे धरणातून ग्रामीण भागासाठी सोडलेले पाणी वाटेत वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईच्या काळात नवीन बांधकामांना नळजोडण्या देताना सावध भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याचे आव्हान

गतवर्षी नडगाव येथील खाण तलावातून टँकरद्वारे पाणी आणून करंजखोल जलशुद्धीकरण केंद्रात पुरवठा करावा लागला होता. यंदाही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी आर्थिक तरतूद आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते निखिल शिंदे यांनी केली. नळजोडण्यांमधील गळती तातडीने रोखण्यावरही त्यांनी भर दिला.

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत युतीत बिघाडीचे संकेत? प्रभाग समिती सभापतीपदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज

नगराध्यक्ष कविस्कर यांनी नगरसेवकांना ठणकावले

निविदा प्रक्रियेवरून महाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष सुनील कविस्कर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही नगरसेवकांनी प्रसिद्ध केलेल्या निविदांना अद्याप मंजुरी मिळाली नसल्याबद्दल विचारणा केली असता, कविस्कर यांनी निविदा प्रक्रिया परस्पर राबविणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्षांना विश्वासात घेऊन आणि त्यांना संपूर्ण माहिती देऊनच निविदा काढण्याची प्रक्रिया पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad faces water shortage threat as dam water levels decline municipal council focuses on planning hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
1

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
2

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
3

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
4

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.