Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

महाराष्ट्र धारण जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमा'तील तरतुदींमुळे यापूर्वी अनेक ठिकाणी नियमापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींची खरेदी-विक्री अडचणीत आली होती. मात्र आता तुकडेबंदीमुळे रखडलेले जुने जमीन व्यवहार आता नियमित होणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2026 | 03:14 PM
Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Follow Us
Follow Us:
  • तुकडेबंदीमुळे रखडलेले जुने जमीन व्यवहार आता नियमित होणार असून, फेरफार आणि मालकी हक्काच्या नोंदींचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वीच्या व्यवहारांची कागदपत्रे तपासून महसूल विभाग ऑनलाइन पद्धतीने फेरफार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
  • जमिनीची रीतसर नोंदणी होऊन मालकाचे नाव हक्क अभिलेखात आल्यानंतर पुढील विक्री किंवा हस्तांतरणावर कायदेशीर अडथळा राहणार नाही.
अलिबाग: महाराष्ट्रात तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणीत सापडलेल्या लाखो जमीनधारकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या झालेल्या जुन्या जमीन व्यवहारांना ठरावीक अर्टीची पूर्तता केल्यानंतर नियमित करण्यास सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराच्या जमिनींचे हस्तांतरण किंवा विभाजन झाल्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या फेरफार नोंदी आणि मालकी हक्काच्या नोंदींची प्रक्रिया आता पुन्हा वेगाने सुरू होणार आहे.

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

‘महाराष्ट्र धारण जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमा’तील तरतुदींमुळे यापूर्वी अनेक ठिकाणी नियमापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींची खरेदी-विक्री अडचणीत आली होती. व्यवहार होऊनही कायद्यातील अडथळ्यांमुळे त्यांची अधिकृत नोंदणी किंवा महसूल दप्तरी फेरफार नोंद होत नव्हती. परिणामी, पैसे देऊन आणि खरेदीखत हातात असूनही नागरिकांच्या नावावर मालकी हक्काची सातबारा नोंद होऊ शकली नव्हती.  (फोटो सौजन्य – AI Created) 

स्थानिक महसूल यंत्रणेवर प्रक्रियेची जबाबदारी सोपवली

ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि गतिमान व्हावी, यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी झालेल्या अशा सर्व तुकड्यांच्या व्यवहारांची माहिती संबंधित ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी तातडीने संकलित करून नोंदणी विभागाकडे पाठवायची आहे. संबंधित कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना फेरफार नोंदणीची पुढील सर्व प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्व व्यवहारांना आता कायदेशीर चौकट

नोंदणी बंद असल्याने अनेक नागरिकांनी केवळ अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे जमिनीचे व्यवहार केले होते. अशा सर्व व्यवहारांना आता कायदेशीर चौकटीत आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी संबंधित खरेदीदाराने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर महसूल विभागामार्फत कायद्यातील विहित प्रक्रियेनुसार दस्तऐवजांची नोंदणी आणि महसूल अभिलेखात सुधारणा करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल.

ज्या प्रकरणांमध्ये यापूर्वी तुकड्याचा फेरफार मंजूर होऊनही खरेदीदाराचे नाव प्रत्यक्ष मालकी हक्काऐवजी चुकीच्या किंवा ‘इतर हक्कात’ नोंदवले गेले होते, त्या नोंदींची पुनर्तपासणी करून ३ नोव्हेंबर २०२५ च्या अध्यादेशातील सुधारणांनुसार खरेदीदाराचे नाव योग्य हक्कात नोंदविले जाईल.

‘या’ वापरासाठी निश्चित क्षेत्रांना नव्या तरतुदी लागू

शासनाने नुकत्याच घेतलेल्या या निर्णयानुसार महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व इतर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे, तसेच विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अखत्यारीतील जमिनींचा यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यानुसार अधिसूचित क्षेत्रांतील जमिनी आणि प्रारूप अथवा अंतिम प्रादेशिक योजनेत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य अनुज्ञेय वापरासाठी निश्चित केलेल्या सर्व क्षेत्रांना या नव्या तरतुदी लागू राहतील.

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

सर्वसामान्य खरेदीदारांना मोठी आर्थिक सुरक्षितता लाभणार…

या निर्णयातील सर्वांत महत्वाची व दिलासादायक बाब म्हणजे, एकदा का अशा तुकड्यातील जमिनीची रीतसर नोंदणी होऊन हक्क अभिलेखात मालकाचे नाव लागले, की त्यानंतर त्या जमिनीच्या पुढील पुनर्विक्री किंवा हस्तांतरणावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध राहणार नाही. त्यामुळे कागदोपत्री मालकी असूनही प्रत्यक्ष हक्कांपासून वंचित राहिलेल्या राज्यातील सर्वसामान्य खरेदीदारांना मोठी आर्थिक सुरक्षितता लाभणार आहे. – सचिन ढोले, अपर जिल्हाधिकारी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Maharashtra land fragmentation law old land deals to be regularised major relief for landowners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
1

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?
2

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन
3

Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
4

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.