
Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
माथेरान नगरपरिषदेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२.० अभियांन अंतर्गत या प्रकल्पामध्ये शार्लोट तलावातील गाळ धावरी नदीत सोडण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे निदर्शनास आले. धावरी नदी ही मोरबे धरणाच्या जलसाठा क्षेत्रास मिळणारी महत्त्वाची नदी असून, मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील व इतर क्षेत्रातील सुमारे २५ लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याचे पाणी एकमेव प्रमुख जलस्रोत आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
अशा परिस्थितीत शार्लोट तलावातील मोठ्या प्रमाणातील गाळ धावरी नदीपात्रामध्ये किंवा धरण पाणलोट क्षेत्रात १० ऑगस्ट रोजी सोडण्यात आले आहे. त्या जलयुक्त माती असलेल्या पाण्यामुळे मोरबे धरणाच्या जलाशयात साचण्याची शक्यता असून, त्यामुळे धरणाच्या उपयुक्त जलसाठ्यात घट होणे, जलसाठ्याची क्षमता कमी होणे, पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणे किवा प्रदुषित होणे, तसेच भविष्यात गाळ उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे असून आर्थिक भार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शार्लोट लेक धरणातील गाळ नदीपात्रामध्ये किंवा पाणलोट क्षेत्रात सोडल्यामुळे नैसर्गिक जलस्रोताच्या दीर्घकालीन सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या विषयाची अत्यंत गांभिर्याने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा पर्यावरणासह नैसर्गिक हानी होण्याची शक्यता आहे.
पर्यावरण संवेदनशील नागरिक प्रतिष्ठान माथेरान या संस्थेकडून नवी मुंबई महानगरपालिकेस याबाबत जागरूक करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने माथेरान पालिकेला कळवले होते. परंतु तरीदेखील गाळ नदीपात्रामध्ये किंवा पाणलोट क्षेत्रात सोडल्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोताच्या दीर्घकालीन सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या विषयाची अत्यंत गांभिर्याने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा पर्यावरणासह नैसर्गिक हानी होण्याची शक्यता आहे.