Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक यांच्या घरासमोरदेखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांची झालेली ही चाळण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 03:21 PM
Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • साईनगर परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
  • गणेशोत्सवाच्या काळात वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
  • उत्सवांपूर्वी खड्डे बुजवून रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे.
माणगाव: माणगाव नगरपंचायत हद्दीतील साईनगर पूर्व व पश्चिम परिसरातील कालव्यालगत जाणाऱ्या रस्त्यांची सध्या अक्षरशः दुरवस्था झाली असून, या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने ‘खड्ड्यांचे साम्राज्य’ निर्माण झाले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांची झालेली ही चाळण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, नगरपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

विशेष म्हणजे, माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक यांच्या घरासमोरदेखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था किती गंभीर झाली आहे, याचा प्रत्यय येत आहे. या खड्ड्यांमधून वाहन चालविताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वारांसाठी तर हा प्रवास अधिकच धोकादायक बनला आहे. साईनगर परिसरातील या रस्त्यांवरून दररोज अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असते. खड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

‘उत्सवांपूर्वी तरी रस्ते दुरुस्त करा’

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पाश्र्श्वभूमीवर हजारो नागरिकांची ये-जा होणार असताना नगरपंचायत प्रशासनाने या रस्त्यांकडे तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्यांची आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची ?

साईनगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खड्डयांवर वेळीच उपाययोजना न केल्यास आगामी उत्सवांच्या काळात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची?, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता तरी माणगाव नगरपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोठी कसोटी

येत्या काही दिवसांत साईनगर मित्रमंडळाचा दहीकाला उत्सव तसेच माणगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक असलेल्या ‘साईनगरचा राजा’ गणेशोत्सवाचे आयोजन होणार आहे. या उत्सवासाठी माणगाव तालुक्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने गणेशभक्त साईनगर परिसरात दाखल होतात. मात्र, सध्याच्या रस्त्यांच्या अवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांना याच खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात वाहतूक वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mangao sai nagar roads turn into pothole zone ahead of ganeshotsav raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
1

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता
2

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर
3

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
4

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.