Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

Mera Ration App: मेरा रेशन ॲप लाभार्थ्यांना रेशन व्यवस्थेची माहिती मोबाईलवर उपलब्ध करून देते. ज्यामुळे शिधापत्रिका हरवणे, खराब होणे किंवा वारंवार तिची प्रत काढण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 03:05 PM
आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • ‘मेरा रेशन’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलवर शिधापत्रिकेशी संबंधित डिजिटल माहिती पाहता येणार आहे.
  • आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपीद्वारे पडताळणी करून रेशन कार्ड आणि धान्याशी संबंधित सुविधा वापरता येणार आहेत.
  • रेशन दुकान, उपलब्ध अन्नधान्य आणि व्यवहाराची माहितीही ॲपवर मिळणार असून, अनोळखी लिंक किंवा बनावट ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
शीतलकुमार शिंदे

धाराशिव : पारंपरिक कागदी शिधापत्रिका जपून ठेवण्याची गरज आता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, डिजिटल युगात रेशन कार्डही नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध झाले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेशी संबंधित सुविधांच्या माध्यमातून ‘मेरा रेशन’ (Mera Ration) ॲप उपलब्ध करून देण्यात आले असून, पात्र लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलवर शिधापत्रिकेची डिजिटल माहिती पाहता येते.

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून आवश्यक पडताळणी करून संबंधित सुविधा वापरता येते. रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी नागरिकांना शिधापत्रिकेची प्रत सोबत बाळगावी लागते. मात्र डिजिटल सुविधेमुळे शिधापत्रिकेशी संबंधित माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे शिधापत्रिका हरवणे, खराब होणे किंवा वारंवार तिची प्रत काढण्याची अडचण कमी होणार आहे.

‘मेरा रेशन’ ॲपमुळे अनेक सुविधा

केंद्र शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित ‘मेरा रेशन’ ॲप हे लाभार्थ्यांना रेशन व्यवस्थेची माहिती मोबाईलवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून लाभार्थी आपल्या शिधापत्रिकेशी संबंधित माहिती, मिळणाऱ्या अन्नधान्याची माहिती आणि रेशन दुकानाशी संबंधित तपशील पाहू शकतात. विशेषतः स्थलांतरित कामगार व अन्य लाभार्थ्यांसाठी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ व्यवस्थेमुळे देशातील कोणत्याही भागातून पात्रतेनुसार अन्नधान्याचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक महत्त्वाचा

डिजिटल शिधापत्रिका किंवा रेशनशी संबंधित ऑनलाइन सुविधा वापरताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक महत्त्वाचा ठरतो. मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी करून संबंधित सुविधा वापरता येते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आधार क्रमांकाशी कोणता मोबाईल क्रमांक जोडलेला आहे, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न नसल्यास किंवा जुन्या क्रमांकावर ओटीपी जात असल्यास संबंधित सुविधा वापरताना अडचण येऊ शकते. अशा वेळी नागरिकांनी आधारमधील मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे.

काही क्षणांत मोबाईलवर माहिती

‘मेरा रेशन’ ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून आवश्यक माहिती भरल्यानंतर लाभार्थ्याला आपल्या शिधापत्रिकेशी संबंधित तपशील पाहता येतो. त्यामुळे रेशन कार्डची माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होऊ शकते. डिजिटल शिधापत्रिका ही नागरिकांसाठी विशेषतः प्रवासात, स्थलांतराच्या वेळी किंवा कागदी शिधापत्रिका उपलब्ध नसताना उपयुक्त ठरू शकते.

रेशन दुकानाची माहितीही मिळणार

रेशन व्यवस्थेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर वाढविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना आपल्या रेशन कार्डशी संबंधित माहितीबरोबरच रेशन दुकान, उपलब्ध अन्नधान्य आणि व्यवहाराशी संबंधित माहिती तपासता येते. त्यामुळे लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या धान्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होण्यास मदत होते.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

दरम्यान, डिजिटल रेशन कार्ड किंवा ॲपचा वापर करताना नागरिकांनी ओटीपी, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती किंवा अन्य वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. रेशन कार्ड डाऊनलोड करण्याच्या नावाखाली अनधिकृत लिंक, बनावट ॲप किंवा संशयास्पद संकेतस्थळांवर माहिती भरू नये. अधिकृत शासकीय माध्यमातूनच ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा.

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

डिजिटल सुविधेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. मोबाईलच्या माध्यमातून रेशन कार्ड व रेशनशी संबंधित माहिती उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांचा वेळ, श्रम आणि कागदपत्रे जपण्याची कसरत कमी होणार आहे.

Web Title: Ration card on mobile mera ration app lets beneficiaries check ration details digitally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • app
  • NAVARASHTRA
  • Ration Card

संबंधित बातम्या

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 
1

neOwn App Mumbai: मुलांसमोर वाचनाचा आदर्श ठेवा! मुंबईत रंगलल्या चर्चा सत्रात तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाच सल्ला 

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
2

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
3

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास
4

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.