Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता

गणेश मंडळांनी आतापासूनच तयारीला वेग दिला आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध आकारांच्या आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्याचे काम मूर्तिकारांकडून सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी, देखावे आणि विद्युत रोषणाईची तयारी सुरू केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 03:38 PM
Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सुमारे १५ हजार खासगी आणि २ हजार सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे.
  • गणेशोत्सवासाठी मंडप, सजावट, विद्युत रोषणाई आणि मूर्ती बुकिंगची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
  • कच्चा माल, रंग, वाहतूक आणि मजुरीचा खर्च वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चंद्रपूर: अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची चंद्रपूर जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाई, ध्वनियंत्रणा तसेच गणेशमूर्तीच्या बुकिंगची लगबग अंतिम टप्प्यात आली. यंदा जिल्ह्यात सुमारे १५ हजार खासगी, तर २ हजार सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे.

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

गणेशोत्सव हा जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांपैकी एक आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी आतापासूनच तयारीला वेग दिला आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध आकारांच्या आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्याचे काम मूर्तिकारांकडून सुरू आहे. अनेक मंडळांनी आपल्या पसंतीच्या मूर्तीचे आगाऊ बुकिंग केले असून, घरगुती गणपतींसाठीही नागरिकांकडून मूर्ती खरेदीला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी, देखावे आणि विद्युत रोषणाईची तयारी सुरू केली आहे. विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी मंडळांच्या बैठका होत आहेत.

काही मंडळांकडून आरोग्य शिबिर, रक्तदान, गरजू विद्यार्थ्यांना मदत, प्रबोधनपर कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडूनही तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांना परवानगी, वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे मार्ग, ध्वनिक्षेपकांचा वापर, अग्निसुरक्षा तसेच विसर्जन व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीचे साहित्य, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई, पूजेचे साहित्य, आरास करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली आहेत.

आगामी काही दिवसात बाजारपेठेतील गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये तयारी सुरू झाल्याने जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह आता दिसू लागला आहे. पुढील पंधरा दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील बाजारपेठा आणि प्रमुख शहरांमध्ये गणेशोत्सवाची लगबग आणखी वाढणार आहे.

मूर्तीच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ

यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक तसेच मजुरीच्या वाढलेल्या खर्चाचा परिणाम मूर्तीच्या दरावर झाला असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशभक्तांना काहीशी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. लहान घरगुती मूर्तीपासून ते सार्वजनिक मंडळांसाठीच्या मूर्तीपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीनाही यंदा मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. काही मूर्तिकारांकडून नैसर्गिक रंगांचा वापर करून आकर्षक मूर्ती तयार केल्या जात आहेत.

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

गणेशोत्सवासाठी मूर्ती बनविण्याची तयारी अंतिम टप्यात पोहचलेली असून मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. यंदा मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल, रंग, मजुराच्या मजुरीत वाढ यामुळे गणेशमूर्तीच्या किमती जवळपास २० टक्क्यांनी महागलेल्या आहेत. महागाईच्या काळातही अंतिम टप्यातील काम पूर्ण करण्याकडे मूर्तिकारांचा भर दिसून येत आहे.- हरीश मंचलवार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद, चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur ganeshotsav preparation begins ganesh idol prices rise by 20 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Jui Gadkari post:  ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट
1

Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
2

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
3

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर
4

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.