
Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेक प्रकरणी जिल्हाधिकारी आक्रमक; नगरपरिषदेला कारणे दाखवा नोटीस
ब्रिटिश काळापासून माथेरानमधील पाण्याचे मुख्य स्तोत्र म्हणून पाहिले जात आहे. १९८० पर्यंत माथेरान शहरासाठी याच शार्लोट लेकमधून पाणी शहरात वितरित केले जात होते. या लेकमधील माती मिश्रित गाळ काढण्याचे काम पूर्वी दरवर्षी माथेरान नगरपरिषद मनुष्यबळ यांचा वापर करून करीत होती. (फोटो सौजन्य – AI Created)
रोजंदारीवर मजूर घेऊन गाळ काढून तो बाहेर काढण्याचे काम २०१३ नंतर एकदाही झालेले नाही. त्यामुळे गाळ आणि माती यांनी भरलेला तलाव स्वच्छ करावा यासाठी माथेरान नगरपरिषदेकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी होती. या मागणीसाठी उपोषणे देखील झाली असून नगरपरिषदेने आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी शार्लोट लेक मधील गाळ काढला नव्हता. १० ऑगस्ट रोजी लेकमधील गाळ वाहून जावा यासाठी लेकमधील पाणी सोडण्यात आले, मात्र लेकमध्ये माती आणि गाळ तसाच होता, त्यामुळे पुढे दररोज शार्लोट लेकमध्ये पाणी अडवण्याचे आणि सोडण्याचे काम सुरु होते.
या सर्व घटनांची माहिती आणि अहवाल सादर करण्याची नोटीस रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष आणि रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माथेरान नगरपरिषद यांना बजावली आहे. यामुळे माथेरान नगरपरिषद अडचणीत आली आहे, त्याचवेळी लेक मधील पाणी सोडण्याच्या विहिरीची चावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या ताब्यात असते, ती चावी कोणी दिली हे देखील यानिमिताने समोर येणार आहे. तर मोरबे धरणात गाळ मिश्रित पाणी सोडण्यात आल्याने त्याची जबाबदारी कोणावर निश्चित केली जाणार हे देखील जिल्हाधिकारी यांच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे माथेरान मध्ये शार्लोट लेक मधील पाणी सोडण्याचे काम हे कोणाच्या अंगलट येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप
याचा सर्वात मोठा फायदा लेक मधील १००० ट्रक गाळ बाहेर काढल्याचा कांगावा केला आणि निधी लाटला. शहरात कुठेही हा १००० ट्रक गाळ दिसून येत नाही आणि त्यामुळे ठेकेदार कंपनीला वाचवण्यासाठी माथेरान नगरपरिषद शार्लोट लेकमधील पाणी सोडण्याचे नाटक करीत आहे. तीन चार दिवस पाणी अडवून आणि पुन्हा सोडून देखील लेक मधील गाळ आहे तसाच आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे पितळ उघडे पडले आहे, मात्र सर्वाधिक अडचण आता रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून देण्यात आलेल्या नोटीसमुळे निर्माण झाली आहे. शार्लोट लेकमधील पाणी नगरपरिषदेने सोडले, त्या पाण्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अधिकार आहे. त्या पाण्याची विक्री देखील जीवन प्राधिकरण करीत असते.