Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त
Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप
महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या भेगांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः आणि लहान वाहनधारकांसाठी हा मार्ग जीवघेणा दुचाकीस्वार बनला आहे. अचानक समोर येणाऱ्या भेगांमुळे वाहनांचा तोल जाऊन किरकोळ अपघात घडत असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. या महामार्गाची देखभाल आणि नियमित पाहणी करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असताना संबंधित अधिकारी आणि अभियंते या मार्गावरून वारंवार प्रवास करूनही रस्त्याची दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास कशी येत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या मार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
तरीही प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही वर्षांतच कोट्यवधी रुपयांच्या महामार्गाची झालेली ही अवस्था कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची चर्चा होत आहे. महामार्गावरील सर्व भेगांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
राष्ट्रीय ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गावरील भेगा वाहनचालकांच्या जीवाशी खेळत आहेत. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. येत्या काही दिवसात आवश्यक कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. -अण्णाजी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते, रूई
कोट्यवधी रुपये खर्च उभारण्यात आलेल्या या महामार्गाची काही वर्षांतच झालेली दुरवस्था अत्यंत गंभीर आहे. रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे दररोज हजारो वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, – प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्य