Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्यासह 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राज ठाकरेंच्या पक्षात खळबळ

रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने पक्षात मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 23, 2026 | 03:27 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Follow Us
Follow Us:
  • रायगडमध्ये मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांचा राजीनामा
  • त्यांच्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
  • शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या भेटीनंतर ठाकूर यांच्या पुढील राजकीय वाटचालीची चर्चा
 

राज्यातील राजकीय पक्षांमधील पक्षांतरांच्या घडामोडी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेल्या नाराजीचे रूपांतर आता मोठ्या राजकीय घडामोडीत झाले असून, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी राजीनामा दिल्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संदीप ठाकूर यांना डावलून मनसेने रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या निर्णयानंतर पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती. माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही सोशल मीडियावरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.

55 पदाधिकाऱ्यांचेही राजीनामा

दरम्यान, संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर 55 पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, योगेश कदमांची मोठी माहिती

याचदरम्यान संदीप ठाकूर यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, या भेटीचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून ती केवळ कौटुंबिक भेट असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

“कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय”

पुढील राजकीय निर्णयाबाबत बोलताना संदीप ठाकूर म्हणाले की, “महिनाभरापासून मी माझ्या पुढील वाटचालीबाबत विचार करत आहे. आम्ही लोकांमध्ये राहून लोकहितासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व संधी देत असेल तर त्याबाबत विचार करू. अंतिम निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल.”

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

एका बाजूला संदीप ठाकूर यांचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे यामुळे मनसेसमोर रायगडमध्ये संघटनात्मक आव्हान निर्माण झाले आहे. या नाराजीचे रूपांतर पुढे मोठ्या राजकीय हालचालीत होते का, तसेच संदीप ठाकूर कोणता निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mns raigad crisis 55 office bearers resign after sandeep thakur resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • MNS
  • MNS Raj Thackeray
  • Raigad News

संबंधित बातम्या

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
1

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
2

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
3

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल
4

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.