माथेरान शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानकाच्या समोर बोहरी समाज हॉल आहे. दुमजली बोहरी समाज हॉल मध्ये नवीन कामे सुरू असून माथेरानमध्ये कोणत्याही नवीन कामांना परवानगी नाही.असे असताना नवीन कामं सुरू असून हॉलमागील बाजूस वन विभागाचा राखीव भूखंड आहे. या भूखंडावर सध्या एका कोपऱ्यात स्वच्छता गृहाची पेटी पडलेल्या अवस्थेत आहे.अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा अतिक्रमण नाही.मात्र बोहरी समाज हॉलचे वाढीव आणि अनधिकृत बांधकाम करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि खराब साहित्य हे वन विभागाच्या जागेत अस्ताव्यस्त टाकण्यात आले आहे.त्यासाठी वन विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. या ठिकाणी वन विभागाच्या जमिनीचा बेकायदा वापर केला जात असून तेथे दिवसरात्र बोहरी समाज हॉलचं बांधकाम सुरू आहे.त्या कामासाठी रात्री उशिरा पर्यंत कामे सुरू असताना आणि परिसरातील शांतता भंग करण्याचे कार्य तेथे सुरू आहे.
कालच्या रात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास सुरू असलेले काही कामे सुरू असताना जोरजोराने काही दगड कापण्याची कामे सुरू होती. त्यामुळे आवाजाने परिसरात झाडांवर असलेले पक्षी पळून जातील एवढा कर्कश आवाज येथे रात्रीच्या वेळी होता . परिणामी झोपमोड आणि अनधिकृतपणे रात्री बारा नंतर देखील सुरू असलेली कामे यामुळे कृष्णा हॉटेलचे मालक रेखा बेलोसे यांनी जंगल असलेल्या भागात रात्री एक दीड वाजता जाऊन येथील काम बंद पाडले.
त्यानंतर संतापलेल्या रेखा चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन असताना रात्रीच्या वेळी कर्कश आवाजात बांधकाम केले जात असल्याने पशु पक्षी यांचे काय झाले असेल असा सवाल उपस्थित केला आहे. येथील बांधकाम त्वरित बंद करून संबंधित यांनी कायदा मोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी होती.त्यानंतर आज सकाळी माथेरान पालिकेच्या पथकाने नगर अभियंता यांच्यासोबत पालिकेचे विरोधी पक्षनेते आणि अन्य नगरसेवक यांच्या बरोबर वन भूखंड येथे जाऊन पाहणी केली.त्यावेळी अभियंता करुणा बांगर यांनी बोहरी समाज हॉल परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करीत आपला अहवाल तत्काळ मुख्याधिकारी यांना सादर केला जाईल असे आश्वासन विरोधीपक्षनेते सीताराम कुंभार यांना दिले.
त्यावेळी वन विभागाचे कर्मचारी देखील पोहचले असून त्यांनी वन जमिनीवर बंधक साहित्य,उत्खनन केलेली माती टाकण्यात आली असून अन्य टाकावू साहित्य टाकणाऱ्या वर कारवाईचा बडगा उगारला जाईल असे आश्वासन नगरसेवक सीताराम कुमार,सचिन दाभेकर,किरण पेमारे आणि रांजाणे यांना दिले आहे.वन विभागाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणाबद्दल नोटीस काढली जाईल असे आश्वासन देखील देण्यात आले असून वन विभागाचा भुखंड अतिक्रमण मुक्त करून द्यावा अशी सूचना माथेरान नागरी पतसंस्थेचे तज्ञ संचालक गिरीश पवार यांनी केली आहे.






