Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे न मिळताच संपली. बैठक सुरू होताच वार्षिक सभेचा अजेंडा मिळत नसल्याबद्दल शेतकरी सदस्यांनी तक्रार केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2026 | 03:06 PM
Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Follow Us
Follow Us:
  • नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नेरळ येथील शेतकरी भवनमध्ये झाली
  • मागील वार्षिक सभेत झालेल्या निर्णय आणि ठराव यांची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी नाराजी
  • अनेक शेतकरी व जमीनदारांनी ही अट शिथिल करण्याची मागणी केली
कर्जत: कर्जत तालुक्यातील मोठी विविध विकास कार्यकारी सोसायटी समजल्या जाणाऱ्या नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे न मिळताच संपली. मात्र या सभेत पुढील सभेत जुने प्रश्न उद्भवणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले आहे. दुसरीकडे सोसायटीकडून गोदाम बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याचा निर्णय असून आणखी एक आठवडा पाऊस पडला नाही, तर दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येईल आणि त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणीचे निवेदन शासनाला देण्याचे ठरले.

Nagpur News : इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नेरळ येथील शेतकरी भवनमध्ये झाली. बैठक सुरू होताच वार्षिक सभेचा अजेंडा मिळत नसल्याबद्दल शेतकरी सदस्यांनी तक्रार केली. त्यानंतर अजेंडासोबत अहवाल आणि वार्षिक ताळेबंद दिला जात नसल्याने सभा बेकायदेशीर आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यावेळी सभा अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी संस्थेची चूक मान्य करीत पुढील वार्षिक सभेपासून अहवाल आणि ताळेबंद सर्व शेतकरी सदस्यांना दिला जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर इतिवृत वाचन केले जात असताना अनेक विषयांची अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार शेतकरी मारुती विरले आणि संदीप मसणे यांनी केली. मागील वार्षिक सभेत झालेल्या निर्णय आणि ठराव यांची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. (फोटो सौजन्य – AI Created)

कर्जत तहसीलदारांना देणार निवेदन

यावेळी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन विकत घेण्याचे निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी जाहीर केले, त्यावेळी तुम्ही संचालक मंडळाने जमीन बघावी. परंतु सर्व व्यवहार पूर्ण करू नये. जमीन खरेदी करण्याआधी सर्व सदस्य शेतकरी यांची सभा घेण्याची मागणी पुंडलिक शिनारे यानी केली.

त्यावर तात्काळ कर्जत तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्यात यावे, असे यावेळी ठरले. यावेळी संस्थेचे संचालक सावळाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेला अध्यक्ष राजेंद्र विरले, उपाध्यक्ष रवींद्र झांजे, तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य नागो गवळी, संचालक शशिकांत मोहिते, यशवंत कराळे, विष्णू कालेकर, नारायण तरे, संजय शिंदे, वैभव भगत, घोडू आखाडे तसेच महिला संचालक अर्चना शेळके, कुंदा सोनवले, तसेच सचिव श्रीकांत पिंगळे आदी प्रमुख उपस्थित होते.

ई – पीक पाहणी होत नसल्यामुळे नाराजी

ई-पीक पाहणी होत नसल्याने तहसीलदारांना निवेदन द्यायची मागणी केली. त्यावेळी अध्यक्षानी मागील वर्षी असा पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर देखील ई-पीक पाहणी होत नसल्याने मारुती विरले आणि शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत कठोर भूमिका संचालक मंडळाने घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी जमीनदार यांच्या सह्या घेतल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार संदीप मसणे यांनी केली.

कर्जमाफी लाभार्थी यादी वाचण्यासाठी टाळाटाळ

अनेक शेतकरी व जमीनदारांनी ही अट शिथिल करण्याची मागणी केली. त्यावर संचालक मंडळ आणि अध्यक्षांकडून वरिष्ठांची मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले, परंतु कोणताही निर्णय झाला नाही.

शासनाची कर्जमाफी सर्वांना मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आणि यादी वाचण्याची मागणी केली. मात्र वेळ नाही म्हणून सचिवांनी यादी वाचण्याची टाळाटाळ केली. त्यावेळी शेवटी फक्त कागदपत्र अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांची यादी वाचण्यात आली. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळाली नाही? याचे उत्तर देताना अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी त्यांची अपूर्ण कागदपत्र परिपूर्ण केली जातील, असे आश्वासन दिले.

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

राज्यात दुष्काळ जाहीर झाला असून कर्जत तालुक्यात आणखी ८ दिवस पाऊस पडला नाहीतर आपल्या तालुक्यात देखील दुष्काळासाठी परिस्थिती निर्माण होईल. कर्जत तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्याचे या सभेत ठरवण्यात आले आहे. – सावळाराम जाधव, सभा अध्यक्ष

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Neral development society meeting farmers raise loan waiver e crop survey and drought concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
1

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
2

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत
3

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
4

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.