Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

SIR: निवडणूक आयोगाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना आयोगातील प्रश्न, सूचना आणि अंतर्गत चर्चा या निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. तिन्ही निवडणूक आयुक्तांमध्ये संवादातून मतभेद दूर झाल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 02:35 AM
SIR विरोधात रायगड काँग्रेसचा एल्गार

SIR विरोधात रायगड काँग्रेसचा एल्गार

Follow Us
Follow Us:
  • SIR विरोधात रायगड काँग्रेसचा एल्गार
  • अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
अलिबाग: विशेष सखोल पुनरावृत्ती अर्थात SIR प्रक्रियेतून पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप करत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवारी अलिबागेत जोरदार आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करावी, दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे (दक्षिण) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता अलिबाग येथील बॅ. ए. आर. अंतुले भवन अर्थात काँग्रेस भवन, कर्वे रोड येथून मोर्चाला सुरुवात झाली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले. घोषणाबाजी करत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.

SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला. मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जात आहेत का, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच SIR प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली.

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला काँग्रेसने दिला. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आयोगाच्या काही निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदविल्याचा दावा या वृत्ताच्या आधारे करण्यात आला आहे. SIR प्रक्रिया, मतदार नोंदणी-वगळणी तसेच निवडणूक आयोगाच्या IT प्रणालीशी संबंधित मुद्द्यांवरही आक्षेप नोंदविल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकतेवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. मतदार यादीतील बदलांची प्रक्रिया पारदर्शक आणि नागरिकांना पडताळता येण्याजोगी असावी, अशी भूमिका पक्षाने मांडली.

‘आपलं मत – आपला अधिकार’

‘आपलं मत – आपला अधिकार’ आणि ‘भारतीय संविधानाचे रक्षण’ या घोषणांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भारतीय नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणून लोकशाहीचा संकोच केला जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच त्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली. SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची किती नावे वगळण्यात आली, त्यापैकी किती मतदारांनी आक्षेप नोंदविले आणि किती नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली, याची अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणीही काँग्रेसने केली.

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी

आयोगाकडून स्पष्टीकरण

दरम्यान, निवडणूक आयोगाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना आयोगातील प्रश्न, सूचना आणि अंतर्गत चर्चा या निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. तिन्ही निवडणूक आयुक्तांमध्ये संवादातून मतभेद दूर झाल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेले आरोप आणि मागण्या या पक्षाच्या राजकीय भूमिकेचा भाग असून, संबंधित बाबींवर अधिकृत नोंदी व स्वतंत्र चौकशीच्या आधारेच अंतिम निष्कर्ष निघू शकतो.

SIR प्रक्रियेवरून देशभरात राजकीय वाद सुरू असतानाच रायगडमध्ये काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. मतदार यादीतील बदल, पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता हे मुद्दे या आंदोलनातून काँग्रेसने केंद्रस्थानी आणले आहेत.

Web Title: Raigad congress protest against collector office about sir process and gyanesh kumar resign demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Alibaug
  • Election Commission
  • raigad
  • SIR

संबंधित बातम्या

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
1

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही
2

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

CM Devendra Fadnavis  : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
3

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू
4

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.