• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Raigad District 392 Villages Landslides Risk Erosion After A Survey By Geologists

Landslides Risk : रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका, धूप भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर आणखी २८९ गावांचा समावेश

रायगड जिल्ह्यात एक-दोन वर्षांत दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे भूवैज्ञानिकांकडून जिल्ह्यातील अनेक गावांचे काटेकोरपणे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 29, 2025 | 10:18 PM
रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका, धूप भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर आणखी २८९ गावांचा समावेश

रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका, धूप भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर आणखी २८९ गावांचा समावेश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रायगड जिल्ह्यात एक-दोन वर्षांत दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे भूवैज्ञानिकांकडून जिल्ह्यातील अनेक गावांचे काटेकोरपणे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात १०३ गावांना दरडींचा धोका होता. तर भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर भूस्खलनाचा धोका असलेल्या आणखी २८९ गावांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ३९२ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. राज्याच्च्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Raigad News : माथेरानमध्ये अवतरला स्वर्ग; पावसामुळे हवेत पसरली धुक्याची चादर

या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अधिक पाऊस पडतो. डोंगररांगांमध्ये धूप होत असल्यामुळे गाळ तयार होतो. हा गाळ डोंगरउतारावर जमा होत असतो. अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ अतिरिक्त भार निर्माण करतो. ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो, तेथे निर्माण होणाऱ्या निसटत्या पृष्ठभागावरून त्याची घसरण्याची प्रक्रिया सुरू होते.

सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना रायगड जिल्ह्यात २००५ मध्ये झालेल्या

भूस्खलनाच्या घटनांमध्ये २१२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये तळीये गावावर दरड कोसळली होती. ज्यात ८४ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी इरशाळवाडी येथे दरड कोसळून ८४  जणांचा मृत्यू झाला होता. कोकणातील बाकीच्या जिल्ह्यामध्येही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या मान्सून १५ दिवस आधीच दाखल झाला आहे.  पावसाने वादळी वाऱ्यासह सुरुवात केली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरडीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी

जिल्ह्यात मागील काही वर्षात झालेल्याभूस्खलनाच्या घटनांच्या पाश्वभूमीवर जिल्या प्रशासनाने दरडीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तयारी केलेली दिसते. जिल्ह्यातील वर्ग एक व दोन अशा बोकादायक असणाऱ्या गावांना संपर्कासाठी सार्वजनिक उद्‌घोषणा प्रणाली देण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाव वेळी या ठिकाणी हवामान पूर्वसूचना प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच आपत्ती काळात थेट संदेश प्रसारित होणार आहे. धोकादायक ठिकाणी सायरनची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इन्व्हर्टर बॅटरीही देण्यात आल्या आहेत.

संभाव्य धोकादायक यादीत नसलेल्या गावांमध्येही दरड कोसळल्याच्या घटना

रायगड जिल्हयाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. महाड, पोलादपूर हे दोन अतिदुर्गम तालुके आहेत. पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात दरवर्षी  सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. सलग दोन-तीन दिवस होणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरभागांना भेगा पडतात, माती सैल होऊन दरड कोसळण्याची शक्यता निर्माण होते. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील गावांमध्ये दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा संभाव्य धोकादायक यादीत समावेश नसलेल्या गावांमध्येही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

Badlapur Kanjur Metro: मुंबई ते बदलापूर एका तासात गाठता येणार, मेट्रो 14 काम कधी होणार सुरू?

आवश्यक ती यंत्रसामग्री सज्ज

सरकारकडून नैसर्गिक आपत्तीचा धोका असणाऱ्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन किट पाठवण्यात आले आहेत. किटमध्ये ३० हुन अधिक वस्तु, असणारी तरंगणारी प्रथमोपचार पेटी आहे.

सीपीआर मास्क, बैंडेज, नेक बेल्ट, सेफ्टी गांगल, टॉर्च, शोध व बचाव दिवा, टूल किट, वेगवेगळे दोरखंड, हेल्मेट, ग्लोज, लाइफ जॅकेट, गम बूट, तरंगणारे व फोल्डिंग स्ट्रेचरचा समावेश आहे. तसेच दरहप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात येते.

अतिमुसळधार पावसाच्या कालावधीत स्थानिक नागरिकांना वेळोवेळी सूचना करण्यात येतात. दरडग्रस्त भागात आवश्यक यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात येते. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी इमारती सज्ज ठेवल्या जातात. शिवाय आपत्ती निवारणासंबंधित यंत्रणांनाही सज्ज केले जाते.

पाच गटांत केली वर्गवारी

दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांची पाच गटात वर्गवारी करण्यात आली आहे. वर्ग एक अर्थात सर्वाधिक धोका असलेली १८ गावे आहेत. त्यात सर्वाधिक महाड आणि पोलादपुरात गाये आहेत.

वर्ग दोनमध्ये ७१. वर्ग तीनमध्ये १५९, वर्ग चारमध्ये ४९ आणि वर्ग पाचमध्ये ७३ अशा एकूण ३९२ गावांचा समावेश आहे. सर्वाधिक गावे पोलादपूर (१४०), महाड (१२१) मध्ये आहेत. फक्त उरण तालुक्यात दरडींचा धोका असलेले एकही गाव नाही, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

Web Title: Raigad district 392 villages landslides risk erosion after a survey by geologists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 10:18 PM

Topics:  

  • Landslide News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
1

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी
2

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र
3

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का
4

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM
Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Nov 18, 2025 | 09:51 PM
Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Nov 18, 2025 | 09:35 PM
मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Nov 18, 2025 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.