Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप

राज्य सरकारच्या सुधारित दुष्काळी तालुक्यांच्या यादीत रायगड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भातपिकाचे नुकसान आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2026 | 12:13 PM
दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • सुधारित दुष्काळी यादीत राज्यातील १२ जिल्ह्यांमधील ४० तालुक्यांचा समावेश.
  • शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुकांना यादीत स्थान.
  • भातपिकाचे नुकसान झाल्याचा दावा; रायगडमधील शेतकऱ्यांकडून दुष्काळी सवलतींची मागणी.
राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या सुधारित यादीत रायगड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाअभावी भातपिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुष्काळी सवलतींपासून जिल्ह्याला बंचित ठेवण्यात आल्याचा आरोप होत असून, महायुती सरकारने रायगडच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित दुष्काळी यादीत राज्यातील १२ जिल्ह्यांमधील एकूण ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. सांगली आणि गोंदिया जिल्ह्यांतील प्रत्येकी सात, सातारा जिल्ह्यातील पाच, तर चंद्रपुर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन तालुक्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आल आहे. विशेष म्हणजे, रायगडच्या शेजारी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, मंडणगड आणि खेड या तालुक्यांना दुष्काळी यादीत स्थान देण्यात आले आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

दिवाळीचा सण जवळ आला असताना हातातोंडाशी आलेले भाताचे पीक पावसाअभावी वाया गेल्याची परिस्थिती अनेक भागांत निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील उत्पन्न घटल्याने आणि पुढील हंगामाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

दिवाळीचा सण जवळ आला असताना हातातोंडाशी आलेले भाताचे पीक पावसाअभावी वाया गेल्याची परिस्थिती अनेक भागांत निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील उत्पन्न घटल्याने आणि पुढील हंगामाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भातपिकाचे नुकसान; आश्वासनांनंतरही पदरी निराशा

यापूर्वी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत रायगड जिल्ह्यातील केवळ श्रीवर्धन तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर कर्जत, महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, अलिबाग, पेण आणि पनवेल यांसह जिल्ह्यातील विविश्व भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने या तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी जोर धरत होती. जिल्ह्यातील भातशेतीला पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पुढील यादीत रायगडमधील तालुक्यांचा समावेश केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच नव्या यादीतही जिल्ह्याला स्थान मिळाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad district excluded maharashtra drought affected taluka list farmers paddy crop loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • drought news
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका
1

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
2

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
3

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
4

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.