Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हर घर जल’ योजनेचा खालापुरात पुरता फज्जा, ठेकेदारांकडून निकृष्ठ दर्जाचे काम , गावकऱ्यांचा गंभीर आरोप

या योजनेची जेव्हा खालापूर तालुक्यातील माहिती घेतली तेव्हा हे विदारक सत्य समोर आले. खालापूर तालुक्यात मंजूर झालेल्या 91 योजनापैकी फक्त 30 योजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती मिळाली तर 61 योजना अपूर्ण असल्याचे दिसून आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2025 | 02:44 PM
‘हर घर जल’ योजनेचा खालापुरात पुरता फज्जा, ठेकेदारांकडून निकृष्ठ दर्जाचे काम , गावकऱ्यांचा गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

खोपोली/ प्रवीण जाधव : केंद्र शासनाने ‘हर घर जल’ या संकल्पनेतून 2019 साली जलजीवन मिशन ची घोषणा केली. या योजने अंतर्गत खालापूर तालुक्यात 91 योजना मंजूर झाल्या व त्यांचे काम सुरु झाले.केंद्र शासनाच्या निर्णयानुसार 2024 पर्यंत या योजना पूर्ण होऊन ग्रामीण भागात घराघरात नळाने पाणी पोहचणे अनिवार्य होते पण खालापुरात तसे झाले नाही. 91 पैकी फक्त 30 योजनाच पूर्ण झाल्या असून उर्वरित 61 योजना अजून अपूर्ण आहेत.

केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजनेला मुदतवाढ दिली असून यावर्षी डिसेंबर 2025 पर्यंत यातील आणखीन 25 योजना पूर्ण होतील अशी माहिती जलजीवन मिशनचे खालापूर पंचायात समितीचे उपअभियंता संतोष चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

‘हर घर जल’ म्हणजे प्रत्यक घराला पाणी, ही भारत सरकारच्या जल शक्ती मंत्राल्याने 2019 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरु केलेली योजना आहे.ज्याचा उद्देश 2024 पर्यंत दीर्घकालीन आधारावर दररोज प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 55 लिटर पिण्याचे पाणी दररोज पुरवणे होता. तशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 च्या स्वातंत्रदिनाच्या भाषाणात केली होती व 3.60 लाख कोटी रुपयांची तरतुद करून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नलजोडनीचे उद्दिष्ट मांडले होते. पण खालापुरात या योजनेचा पुरता फज्जा उडालेला दिसला.

MSRTC News: परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

2024 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करणे प्रशासनाला जमलेच नाही. या योजनेची जेव्हा खालापूर तालुक्यातील माहिती घेतली तेव्हा हे विदारक सत्य समोर आले असून खालापूर तालुक्यात मंजूर झालेल्या 91 योजनापैकी फक्त 30 योजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती मिळाली तर 61 योजना अपूर्ण असल्याचे समजले. त्याची अनेक कारणे समजली, बऱ्याचश्या योजना ठेकेदाराला वेळेत निधी मिळाला नाही म्हणून अपूर्ण राहिल्या आहेत तर काही योजनाच्या साठवण टाक्या बांधन्यास जागा उपलब्ध होत नाहीये म्हणून अर्धवट आहेत तर काही योजना विजेचे म्हणजे विद्युत कनेक्शन मिळाले नाही म्हणून अर्धवट आहेत. तर काही योजना ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केले असल्याचा आरोप करीत गावाकार्यांनी बंद पाडल्या आहेत आणि काही योजना ठेकेदार अर्धवट उभारून काम सोडून गेले असल्याने अर्धवट स्थितीत आहे.

Nanded Worker Woman Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर कोसळला विहिरीत

या जलजीवन मिशन बाबत खालापूर पंचायत समितीचे जलजीवन मिशनचे उपअभियंता संतोष चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली असता मंजूर 91 पैकी 30 योजना पूर्ण झाल्या असून शासनांकडून या योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ मिळाली असून डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम टप्प्यात असणाऱ्या आणखीन 25 योजना तालुक्यात पूर्ण होतील व उरलेल्या योजनाच्या अडचणी दूर करून 2028 च्या आत सर्व योजना पूर्ण होतील अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Raigad jaljeevan mission scheme in shambles poor quality work by contractors serious allegations by villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Karjat
  • Khalapur
  • raigad
  • water issues

संबंधित बातम्या

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
1

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
2

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत
3

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत

Raigad : खालापुरात शिवसेनेला धक्का! शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
4

Raigad : खालापुरात शिवसेनेला धक्का! शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.