Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: ८ महिन्यांत निवृत्ती… तरीही अचानक बदली, श्रीवर्धनमध्ये नेमकं काय घडलं? ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

श्रीवर्धन तालुक्यातील बोलींपंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. महार तलाव सुशोभीकरणातील कथित गैरव्यवहाराची चौकशी टाळण्यासाठीच ही बदली करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2026 | 02:20 PM
Raigad News: ८ महिन्यांत निवृत्ती... तरीही अचानक बदली, श्रीवर्धनमध्ये नेमकं काय घडलं? ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

Raigad News: ८ महिन्यांत निवृत्ती... तरीही अचानक बदली, श्रीवर्धनमध्ये नेमकं काय घडलं? ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

Follow Us
Follow Us:
  • सेवानिवृत्तीला अवघे ८ महिने बाकी असताना प्रशासक किशोर नागे यांची तातडीने बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला.
  • महार तलाव सुशोभीकरणातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन निधी वापरू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
  • प्रशासनाने ही बदली नागे यांच्या विनंती अर्जानुसार झाल्याचे स्पष्ट केले असून ग्रामस्थांनी मात्र राजकीय दबावाचा आरोप केला आहे.
दिघी: श्रीवर्धन तालुक्यातील बोलींपंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे यांची सेवानिवृत्तीस अवघे ८ महिने शिल्लक असताना तडकाफडकी बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. महार तलाव सुशोभीकरण कामातील कथित गैरव्यवहाराची चौकशी टाळण्यासाठी आणि नव्या निधीचा प्रस्ताव मंजूर न केल्याच्या रागातूनच ही सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा थेट आरोप बोलींपंचतनवासियांनी केला आहे. या बदलीसाठी स्थानिक राजकारण्याने दबाव आणल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Raigad News: ‘म्युल अकाऊंट’ धारकांवर रायगड पोलिसांची धडक कारवाई; ३५ कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

महार तलावाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण झालेले काम अपूर्ण असून, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी चौकशीची मागणी लावून धरली होती. अशातच अपूर्ण कामाची चौकशी न करता पुन्हा नव्याने निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ग्रामसभेत आणला गेला. त्याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासक नागे यांच्यावर मोठा राजकीय व वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला जात असल्याचे सांगितले जाते.

प्रलंबित विकासकामांना बसण्याची भीती त्यानंतर नागे यांच्याकडून बदलीचा अर्ज लिहून घेत ‘वयाची ५३ वर्षे पूर्ण झाल्याने स्वेच्छा बदली’ या कारणाखाली तातडीने बदलीचे आदेश काढण्यात आले. सेवानिवृत्ती तोंडावर असताना अशी घाईघाईने केलेली बदली संशय अधिक बळवणारी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांत ३ ते ४ ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार सांभाळताना नागे यांनी पाणीपुरवठा व स्थानिक समस्या थेट मैदानात उतरून सोडवल्या होत्या. त्यामुळे या बदलीचा फटका गावातील प्रलंबित विकासकामांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

तलावाची चौकशी, मगच नवा निधी! ग्रामस्थांचा इशारा

“ज्या तत्परतेने लोकभिमुख प्रशासकाची तडकाफडकी बदली केली, त्याच तत्परतेने महार तलाव सुशोभीकरणातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी का केली जात नाही?, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तलावाच्या कामातील कथित अनियमिततेची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत नव्याने मंजूर झालेला निधी वापरू देणार नाही आणि कोणतेही काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचे नवे नियम; सरकारवर टीका केली तर होणार कडक कारवाई

मागील निधीच्या कामाची चौकशी झालेखेरीज कोणतेही कागदपत्र देण्यात येऊ नये, असा ग्रामसभेचा ठराव पारीत झाल्याने नागे यांनी कागदपत्र न पुरविलेनेच कोणाचा तरी इगो दुखविला गेल्यानेच बदली झाली आहे.- चंद्रकांत धनावडे, ग्रामस्थ, बोलींपंचतन

विस्ताराधिकारी नागे यांच्या बदली हि त्यांच्या विनंती अर्जानुसार केली आहे आणि जिल्हा परिषद मुख्याधिका-यांना तसे अधिकार आहेत. – विशाल तनपुरे, उप कार्यकारी अधिकारी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Raigad mahar talav row administrator kishor nage transfer sparks villagers anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.