Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: हॉस्पिटलमध्ये शूटिंगमुळे रुग्ण हैराण? रेवदंडा आरोग्य केंद्राबाबत नागरिकांचा संताप, OPD सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार

रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या चित्रपट किंवा मालिकेच्या चित्रीकरणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित असल्याने रुग्णालय परिसरात गर्दी निर्माण झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 12:19 PM
हॉस्पिटलमध्ये शूटिंगमुळे रुग्ण हैराण? रेवदंडा आरोग्य केंद्राबाबत नागरिकांचा संताप, ओपीडी सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार (फोटो सौजन्य-ChatGPT)

हॉस्पिटलमध्ये शूटिंगमुळे रुग्ण हैराण? रेवदंडा आरोग्य केंद्राबाबत नागरिकांचा संताप, ओपीडी सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात चित्रिकरणामुळे आरोग्यसेवा विस्कळीत
  • रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचा आरोप
  • ओपीडी सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार
भारत रांजणकर, रेवदंडा : रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या एका चित्रपट अथवा मालिकेच्या चित्रीकरणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. चित्रीकरण सुरू असताना बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार, तांत्रिक कर्मचारी आणि साहित्य आणण्यात आले होते. यामुळे रुग्णालय परिसरात गर्दी निर्माण झाली. काही रुग्णांनी तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याची तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण झाल्याची तक्रार केली आहे.

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल

सरकारी आरोग्य संस्थेत रुग्णसेवेला प्राधान्य देण्याऐवजी चित्रीकरणाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना तपासणीसाठी आले असताना त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियमित कामकाज पूर्ण झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेतच चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली होती. रुग्णसेवा सुरू असताना कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.

डॉ. नेहुलकर म्हणाल्या, “जर ओपीडी सुरू असताना रुग्णांच्या तपासणीस किंवा उपचार प्रक्रियेस बाधा येत असेल तर ते चुकीचे आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास संबंधितांना तत्काळ चित्रीकरण थांबविण्याच्या सूचना दिल्या जातील.” दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक चित्रीकरण करताना रुग्णसेवा बाधित होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. आता जिल्हा आरोग्य प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Web Title: Revdanda primary health centre shooting patient service issue june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Hospital
  • raigad

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
3

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
4

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.