State Govt Is Anti Marathi School Mlc Jayant Asgaonkar Slams Education Policy In Kolhapur
Educational News: मराठी शाळा बंद पाडण्याचा शासनाचा डाव; नेमकं काय आहे प्रकरण?
संघटनेच्या मागण्या संदर्भात मंत्री महोदयांना वेळोवेळी पत्र दिली आहेत; परंतू सहा महिने झाले तरी मंत्री महोदयांकडून बैठकीसाठी वेळ मिळालेली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
मराठी शाळा बंद पाडण्याचा शासनाचा डाव; नेमकं काय आहे प्रकरण?
Follow Us:
Follow Us:
राज्यातील सरकार मराठी शाळा विरोधी
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार रोखणाऱ्या धोरणाविरोधात आसगावकर आक्रमक
शिक्षक आमदार म्हणून तुमचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू
Kolhapur Educational News: ” राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. राज्यातील सरकार मराठी शाळा विरोधी आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करून शासन शिक्षण व्यवस्थेला वेठीस धरत आहे. असे धोरण हाणून पाडण्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील सर्वच घटकांनी शासनाच्या अन्यायी धोरणाला विरोध करावा”, असे आवाहन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले. आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर उद्बोधन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ जिल्हा कोल्हापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस शुभेच्छा देऊन आ. जयंत आसगावकर म्हणाले, शासन विविध कारणे देत मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घालत आहे. आता शिक्षकांबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारक यांचे पगार थांबवण्याचे पाप या शासनाने केला आहे. संघर्ष केल्याशिवाय आपल्या पदरात काहीच पडणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार
संघटनेच्या मागण्या संदर्भात मंत्री महोदयांना वेळोवेळी पत्र दिली आहेत; परंतू सहा महिने झाले तरी मंत्री महोदयांकडून बैठकीसाठी वेळ मिळालेली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
शिक्षक आमदार म्हणून तुमचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडून तुम्हाला न्याय देऊ, अशी ग्वाही आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
ग्ररमुनवाड, कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक बालाजी उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, वेतन पथक अधीक्षक उदय सरनाईक, प्रा. विकास पाटील, कोजिमाशीचे संचालक श्रीकांत कदम, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष जगदीश शिर्के, सचिव अशोक आरेकर, कार्याध्यक्ष संतोष देसाई यांच्यासह प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर उपस्थित होते.
Web Title: State govt is anti marathi school mlc jayant asgaonkar slams education policy in kolhapur