Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Fort : रायगडावर रंगणार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा, ४० समित्यांमार्फत जय्यत नियोजन, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Shivrajyabhishek Sohala 2026: अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगड येथे ५ आणि ६ जून रोजी ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा विविध उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली ४० समित्यांमार्फत नियोजन सुरू असून प्रशासनासोबत समन्वय बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 12:49 PM
रायगडावर रंगणार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा, ४० समित्यांमार्फत जय्यत नियोजन, जाणून घ्या सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक

रायगडावर रंगणार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा, ४० समित्यांमार्फत जय्यत नियोजन, जाणून घ्या सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक

Follow Us
Follow Us:
  • दुर्गराज रायगडावर ५-६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा
  • ३५३ व्या वर्षानिमित्त भव्य तयारी
  • ४० समित्यांमार्फत जय्यत नियोजन
Shivrajyabhishek Sohala 2026 News Maarthi : रायगडावर येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत होणार आहे. दूर्गराज रायगडावर 6 जून 2026 रोजी होणाऱ्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिवभक्तांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दुर्गराज रायगड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडावर शिवाजी महाराजांना “छत्रपती” पदाने गौरविण्यात आले आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. हा दिवस महाराष्ट्रात आणि विशेषतः रायगडावर अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

Raigad News: दुर्गराज रायगडाचा अभिमान पुन्हा ताठ! खुबलढा बुरुज नव्या रूपात, 350 वर्षांनंतर उलगडले रहस्य…

2026 मधील शिवराज्याभिषेक सोहळा कधी?

2026 मध्ये रायगडावर ६ जून आणि तिथीनुसार २६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा हा ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन आहे.

रायगडावरील कार्यक्रमाचे स्वरूप

शुक्रवार, 5 जून 2026
दुपारी 3:30 – पाचाड येथील राजमाता जिजाऊसाहेब यांच्या समाधीस अभिवादन.
दुपारी 4.00 – संभाजीराजे व शहाजीराजे यांच्याकडून पायी गड चढण्यास सुरुवात.
दुपारी 4.15 – नगारखाना येथे समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत गडपूजन.
दुपारी 4.30 – संयोगीताराजे यांच्या हस्ते ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचे भव्य उद्घाटन.
रात्री 8.00 – राजसदर येथे ‘जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहिरी कार्यक्रम.
रात्री 9.00 – शिरकाई मंदिर येथे गडदेवता शिरकाई देवीचा पारंपारिक गोंधळ.
रात्री 9.30 – जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन.

शनिवार, 6 जून 2026 (मुख्य सोहळा)
सकाळी 7.00 – नगारखाना येथे शहाजीराजे यांच्या हस्ते विधीवत ध्वजारोहण.
सकाळी 9.30 – शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदर येथे भव्य आगमन.
सकाळी 10.00 – संभाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीस मुख्य अभिषेक, तसेच राजसदरवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्णमुद्रांचा जयघोषात अभिषेक.
सकाळी 10.20 – युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे देश-विदेशातून आलेल्या शिवभक्तांना जाहीर संबोधन.
सकाळी 10.30 – ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’ या मुख्य पालखी सोहळ्यास सुरुवात.
सकाळी 11 ते 12 – शिवछत्रपतींच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन.
दुपारी 12.15 – जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाला आषाढी पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान.
दुपारी 12:25 – शिवछत्रपतींच्या पवित्र समाधीस अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.

रायगडावर जाणाऱ्यांसाठी सूचना

मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने प्रवास आणि मुक्कामाचे नियोजन आधी करणे महत्त्वाचे आहे. काही शिवभक्तांच्या अनुभवांनुसार, गर्दीमुळे वाहतूक, बस आरक्षण आणि गडावर हालचालीसाठी वेळ लागू शकतो.

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

Web Title: Shivrajyabhishek sohala 2026 on june 6 raigad fort 353rd anniversary full schedule timetable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • raigad
  • Raigad Fort

संबंधित बातम्या

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
1

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा
2

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
3

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता
4

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.