Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव
बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी
गट क्रमांक ३६० मधील जागेचा झोन बदलण्याचा विषय मंजुरीसाठी सभेसमोर आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक गैरहजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सदर झोन बदल कायद्याव्या व नियमानुसार पात्र ठरत असेल, तर नियमानुसार निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका मांडली. शहरात मोकाट घोड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन घोड्यांना ओळख पटावी यासाठी टंग लावण्याचा निर्णय घेण्यात आला. (फोटो सौजन्य – AI Created)
शहरात लेआउट मंजूर न करता प्लॉट विक्री होत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. पाच गुंठे क्षेत्राची बागायती म्हणून खरेदी-विक्री होत असताना त्याचा वापर बांधकामासाठी केला जात असल्यास नियमांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. बाजारपेठेतील रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही चर्चा झाली. रस्त्यालगतचे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे काढून नियमाप्रमाणे सरसकट कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.
दरम्यान, नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. अनधिकृत बांधकामांवरील आक्रमक भूमिका, बाजारपेठ रुंदीकरणाचा विषय मागे जाणे, झोन बदलावरील राजकीय अनुपस्थिती, अतिक्रमणांवरील कारवाईची मागणी आणि वाहतूक व्यवस्थेवरील चर्चा यामुळे श्रीवर्धन नगरपरिषदेची ही सर्वसाधारण सभा विशेष लक्षवेधी व महत्त्वपूर्ण ठरली.
दरम्यान, श्रीवर्धन बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा विषय सभेच्या अजेंड्यावर होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी हा विषय रद्द करण्याबाबत लेखी निवेदन दिल्याने तो अजेंड्यावरून वगळण्यात आला, त्यामुळे बाजारपेठेतील प्रस्तावित रुंदीकरणाबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. सभेतील सर्वाधिक तीव चर्चा अनधिकृत बांधकामांवर झाली.
नगरसेवकांनी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक वेळा नोटिसा बजावूनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकाने घराचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन केल्यास तातडीने कारवाई केली जाते. मात्र व्यावसायिक स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. दोन-तीन नोटिसा देऊनही संबंधित व्यक्तीने बांधकामाची आवश्यक परवानगी घेतली नाही.
सभेच्या प्रारंभी नगरसेवक देवेंद्र भुसाणे यांनी सभेचे इतिवृत्त सात दिवसांच्या आत नगरसेवकांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मागील ठराव क्रमांक १२४ मध्ये सलोनी भगत यांची निवड झालेली असताना संबंधित इतिवृत्तात त्यांचे नाव नमूद नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून इतिवृत्त मंजूर करण्यात आले.
ठराव क्रमांक १५२ मधील महेश्वर आळी येथील रस्त्याच्या बिलासंदर्भात नगरसेवक भावेश मांजरेकर यांनी आक्षेप घेतला, रस्त्यावर पाणी साचत असल्याने नगरपरिषद अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केल्यानंतरच संबंधित बिल अदा करावे, अशी मागणी त्यांनी केली. शाळा क्रमांक ७ येथील विकासकामाच्या भूमिपूजनासाठी नगरसेवकांना आमंत्रित न केल्याचा मुद्दा नगरसेवक मुरकर यांनी उपस्थित केला, भूमिपूजनाचा कार्यक्रम पुन्हा आयोजित करून सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील सार्वजनिक कट्टयांची दुरुस्ती व सुशोभीकरण योग्य पद्धतीने करण्यात यावे, याबाबतही चर्चा झाली. समुद्रकिनारी जीवरक्षक नियुक्त करण्यासाठी निविदा मंजुरीचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला. यावेळी जीवरक्षकांची नावे व मोबाईल क्रमांक दर्शविणारे फलक लावावेत तसेच उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी रजिस्टर ठेवावे, अशी मागणी करण्यात आली, कोकण साहित्य परिषदेला निधी उपलब्ध करून देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. नाभिक समाज सभागृहाशेजारील पऱ्यावर स्लॅब टाकणे या विषयास मंजुरी देण्यात आली.

