Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

श्रीवर्धन शहरातील वाणी आळी बाजारपेठ परिसरातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. व्यापारी, बाधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी बैठक घेऊन या निर्णयाला विरोध करत प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2026 | 01:40 PM
Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • श्रीवर्धनमधील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला.
  • नगरसेवकांनाही अधिकृत माहिती नसताना १३ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर विषय आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
  • नागरिकांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यास तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.
श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरातील वाणी आळी बाजारपेठ परिसरातील व्यापारी, बाधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक स्वप्नील पाब्रेकर यांच्या निवासस्थानी पार पडली. श्रीवर्धन शहरातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विषयाला तीव्र विरोध व्यक्त करत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये या चर्चेसाठी प्रभाग क्रमांक ५, ६ आणि ७ मधील नगरसेवकांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. येत्या १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर रस्ता रुंदीकरणाचा विषय समाविष्ट करण्यात आल्याची माहिती समजताच व्यापारी व नागरिकांनी तातडीने ही बैठक बोलावली होती.

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

माहिती न देता महत्वाचा विषय अजेंड्यावर कसा?

मात्र बैठकीदरम्यान संबंधित नगरसेवकानीच “आम्हालाही या विषयाची कोणतीही अधिकृत माहिती नाही असे स्पष्ट केल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त करण्यात आला. बाधित नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींना माहिती न देता एवढा महत्त्वाचा विषय अजेंड्यावर कसा आला?”, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. (फोटो सौजन्य – AI Created) 

बाधित व्यावसायिक व नागरिकांची झाली बैठक

बैठकीत नागरिकांनी आठवण करून दिली की, निवडणुकीपूर्वी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बाधित व्यावसायिक व नागरिकांची बैठक झाली होती. त्या वेळी रस्ता रुंदीकरणाऐवजी पर्यायी रस्ता विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावा बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता अचानक रस्ता रुंदीकरणाचा विषय पुन्हा पुढे येणे, तो सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर समाविष्ट होणे, आणि त्याबाबत स्थानिक नगरसेवकांनाही माहिती नसणे, यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

…. तर तीव्र लोकआंदोलन उभारू ! व्यापाऱ्यांचा इशारा

बैठकीत उपस्थित व्यापारी आणि नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, स्थानिक नागरिकांचा विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेतल्यास तीव लोकआंदोलन उभारले जाईल. तसेच, १३ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, हा विषय नेमका कोणी, कोणत्या उद्देशाने आणि कोणाच्या सूचनेवरून अजेंड्यावर आणला, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Shrivardhan road widening row traders and locals oppose proposal warn of mass protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती
1

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती

Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
2

Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?
3

Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?

Ethanol Government Subsidy : मोठा निर्णय! आता इथेनॉलवर केंद्राकडून मिळणार सबसिडी! कोणाला, कसा फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर
4

Ethanol Government Subsidy : मोठा निर्णय! आता इथेनॉलवर केंद्राकडून मिळणार सबसिडी! कोणाला, कसा फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.