समरजित घाटगे (फोटो- ट्विटर)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूरमधील भाजप नेते समरजित घाटगे हे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. कारण समरजित घाटगे यांनी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवरून कमळ चिन्ह हटविले आहे. त्यामुळे समरजित घाटगे भाजप सोडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
समरजित घाटगे हे महायुतीकडून कागल विधानसभा मतदारसांघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. दरम्यान महायुतीकडून हसन मुश्रीफ यांना जवळपास उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यानंतर घाटगे हे नाराज झाले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. खासदार धनंजय महाडिक यांनी देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र समरजित घाटगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आता त्यांनी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून कमळ चिन्ह हटविले आहे. त्यामुळे घाटगे हे भाजपला सोडचिट्ठी देणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समरजित घाटगे हे भाजपला सोडचिट्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समरजित घाटगे हे नाराज झाले. कागलमधून घाटगे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता काही होऊ शकत नाही, अशी भूमिका घाटगेंनी शिष्टमंडळासमोर घेतल्याचे समजते आहे.
समरजित घाटगे यांनी २३ ऑगस्टला कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात घाटगे त्यांची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपने केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र समरजित घाटगे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते मुश्रीफ यांच्याविरुद्ध निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे. शरद पवार गटामध्ये समरजित घाटगे प्रवेश करण्याची शक्यता आहे.