वर्धनगड : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव तालुका खटाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या 76 व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी (दि.१०) रथसोहळा संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत रथपूजन होणार असल्याचे मठाधिपती परमपूज्य सुंदर गिरी महाराज व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष रणधीर जाधव व विश्वस्तांनी माहिती दिली.
परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे हे ७६ वर्ष आहे. देवस्थान ट्रस्टच्या व ग्रामपंचायत पुसेगाव यांचे वतीने या वार्षिक यात्रेसाठी पुसेगाव नगरीत सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे विश्वस्त संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, डॉक्टर सुरेश जाधव, गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजयकाका पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व विश्वस्त ग्रामपंचायतीचे सरपंच मसने सर्व सदस्य पुसेगाव परिसरातील विविध संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता रक्त पूजन करण्यात येणार आहे.






