
मात्र, गुरुवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे चिपळूण शहरासह ग्रामीण भागात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. वेहेळे बागवाडी येथील मानसिंग जनार्दन राजेशिर्के यांच्या घराच्या छताची पडझड झाली असून 40 हजार रुपयांचे, टेरव गुरववाडी येथील सिताराम बाबाजी जाधव यांच्या घरावरील छप्पर उडून ३ हजार 700 रुपयांचे तसेच अमोल किशोर कदम यांच्या गुराचा गोठा पूर्णत: कोसळल्याने 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तळसर गुरववाडी येथील बबन बारकू जाधव यांच्या घरावर काजूच्या झाडाची फांदी फोडून 2 हजार 500 रुपयांचे, तळसर बौद्धवाडी येथील सुजाता लक्ष्मण मोहिते यांच्या घराचे कौले उडून ३ हजार रुपयांचे, संदीप केशव मोहिते यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून ३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तर शहरात देखील काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत याची दखल घेऊन नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करून योग्य ते निर्देश दिले आहेत. तर अवकाळी पावसामुळे विजेचा खेळखंडोबा देखील झाल्याचे पहावयास मिळाले. काही ठिकाणी विद्युत वाहिणींवर जाडे व फांद्या कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले आहे.