
"... हा गैरसमज दूर होतोय"; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद
पारदर्शक कारभारामुळे दुग्धव्यवसायातून हजारो शेतकरी सक्षम
कृषी प्रदर्शनातून शेतीला मिळतेय नवी दिशा
डेअरीकडून दररोज ५५ हजार लिटर दूध संकलन
चिपळूण: कोकणातील माणूस काही करू शकत नाही, हा गैरसमज कृषी प्रदर्शनामुळे दूर होत आहे. पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हतेमुळे हजारो शेतकरी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. काही शेतकरी महिन्याला दोन ते अडीच हजारापासून ते साडेतीन-चार लाख रूपयांपर्यंत उत्पन्न घेत आहेत.
शासन, लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, जेणेकरून कोकणातील शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण युवकांना शाश्वत रोजगार मिळेल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रास्ताविकावेळी व्यक्त केला. कोकणातील शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा चाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सव २०२६ चिपळूणमध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाला असून या महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांसाठी नवी आशा आणि नवी दिशा निर्माण झाली आहे.
ठोस दिशा मिळाली…
या महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११.३० वाजता पार पडले, यावेळी प्रास्ताविक करताना वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीचा प्रवास, दुग्धव्यवसायाची उभारणी आणि या माध्यमातून शेतकरी कसा सक्षम झाला याचा सविस्तर आढावा घेतला. बादेवी प्रशांत यादव माणाले की, “हा कृषी महोत्सव चिपळूणामध्ये सलग तिस-या वर्षी यशस्वीपणे होत असून, आमचे मार्गदर्शक नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब याव्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भारासाठी काम करताना आम्हाला एक ठोस दिशा मिशाली आहे. कोकमाचा चेहरा बदलण्याचे काम दादांनी केले असून, शेती व शेतीपूरक उद्योग उभे करण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.”
कर्जफेड करण्याची क्षमता वाढवणारी यंत्रणा उभी
वाशिष्ठी डेअरीची संकल्पना २०२१ साली चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली, सहकार क्षेत्रात काम करताना केवळ कर्जपुरवठा न करता, शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची क्षमता वाढवणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे, या उद्देशाने वाशिष्ठी डेअरीची संकल्पना पुढे आली, असे यादव यानी सांगितले, ते पुढे म्हणाले की, कोकणातील भौगोलिक परिस्थिती, परंपरिक व्यवसाय आणि उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेऊन दुग्धव्यवसाय हाथ शाश्वत प्रथाय असल्याचे लक्षात आल्यानंतर वाशिष्ठी हेअरीची स्थापना करण्यात आली.