Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुहागरात सुपारी सुपात; हापूस अडकित्त्यात! बागायतदारांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’

गुहागरची सुपारी वाशी मार्केटमधून थेट सुरतला जाते. त्यामुळे आखाती देशातील युध्दाचा कोणताही परिणाम निर्यातीवर होणार नसल्याचे सांगण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 03:22 PM
गुहागरात सुपारी सुपात; हापूस अडकित्त्यात! बागायतदारांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’
Follow Us
Close
Follow Us:

गुहागर तालुक्यात यावर्षी सुपारीचे पीक जोरात
खराब हवामानाचा आंब्याला फटका
बागायतदारांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती

दिनेश चव्हाण /गुहागर:  गुहागर तालुक्यात यावर्षी  सुपारीचे पीक जोरात आहे तर दुसरीकडे खराब हवामानाचा फटका बसलेल्या येथील हापूस आंब्याचे पीक मात्र धोक्यात आले आहे. सुपारी गुजरातला जाते तर आंबा पीक उशिराने असल्याने गुहागर तालुक्यातील या दोनही पिकांना सध्यातरी इराण-इस्त्राईल युध्दाचा कोणताही परिणाम जाणवलेला नसल्याने बागायतदारांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती झाल्याचे पहायला मिळत आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीत सातत्याने सापडलेले गुहागर तालुक्यात सुपारीचे पीक यावर्षी भरघोस आले आहे.

सुपारी पिकासाठी प्रसिध्द असणारे तालुक्यातील पालशेत, वडद, गिमवी व काळसूरकौढर, गुहागर ही गावे ओळखली जातात. येथील बागायतदारांचे हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून सुपारी पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यातील एकट्या पालशेतमध्ये दरवर्षी सुपारीचे पीक ७० ते ८० टन होते. त्या पाठोपाठ वडद व गुहागचा नंबर लागतो. यावर्षी तालुक्यात विशेष करुन पालशेत व वडदमध्ये सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे.

Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

परदेशातील सुपारीची कमी दराने विक्री

सुपारीचे पीक कोकणात जास्त आहे. मात्र, थायलंडसारख्या देशातून व कर्नाटक राज्यातून ती स्थानिक बाजारपेठेत कमी दराने व्यापाऱ्यांना विकली जात असल्या स्थानिक बागायदारांच्या सुपारीचा उठाव होत नाही. दरवर्षी ४०० ते ५०० रुपन किलोने जाणारी यावर्षी ३८० दराने विकत घेतली जात आहे. त्यामुळे बागायतदारांन याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. खते, देखभाल, साफसफाई, सोलण्याच मजुरी आदी खर्च यातून सुटत नाही. त्यातच वानर, माकडांचा उपद्रव असल्याने य फळाचे मोठे नुकसान होत नाही.

आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार? “…प्रयत्न करू”; उदय सामंत

गुहागरची सुपारी वाशी मार्केटमधून थेट सुरतला जाते. त्यामुळे आखाती देशातील युध्दाचा कोणताही परिणाम निर्यातीवर होणार नसल्याचे सांगण्यात आले. याउलट या युध्दामुळे इतर देशातून दरवर्षी कोकणात येणारी सुपारी आली नाही तर स्थानिक सुपारीला मोठा दर मिळण्याची आशा बागायतदारांना असल्याचे पालशेतचे बागायतदार पंकज बिर्जे यानी सांगितले. यावर्षी हापूस आंबा पिकाने पाठ फिरवली असून हे पीकही उशिरा हाती येणार असल्याची माहिती वेळणेश्वरचे बागायतदार गोपाळ गोखले यांनी दिली.

Web Title: Betel nuts get good market but bad weather effect on alphonso mango in guhagar kokan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Farmers
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी मोहीम राबवणार
1

Ratnagiri News : चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी मोहीम राबवणार

Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना
2

Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड
3

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड

खेडमधील २ हजार वर्षे जुन्या बौद्ध लेण्यांची दुरवस्था; ऐतिहासिक वारसा बनला दारुड्यांचा अड्डा!
4

खेडमधील २ हजार वर्षे जुन्या बौद्ध लेण्यांची दुरवस्था; ऐतिहासिक वारसा बनला दारुड्यांचा अड्डा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.