Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मामाच्या गावाला जाणं महागलं! एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार

उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना व सुट्टीमध्ये आजोळी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2026 | 11:21 AM
तब्बल 3 किमी धावत राहिली विनाब्रेक एसटी बस; चालक-वाहक गंभीर, तर 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत

तब्बल 3 किमी धावत राहिली विनाब्रेक एसटी बस; चालक-वाहक गंभीर, तर 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत

Follow Us
Follow Us:
  • मामाच्या गावाला जाणं महागलं!
  • एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ
  • प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार
गुहागर : उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना व सुट्टीमध्ये आजोळी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली असल्याने प्रवासी पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पालक सहलींचे आयोजन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात एसटी बसला होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

 

आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यावर झालेला परिणाम आणि वाढते खर्च यामुळे ही दरवाढ अटळ असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ही तात्पुरती भाडेवाढ १५जून पर्यंत राहणार असून, त्यानंतर दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

लांब पल्ल्याचा प्रवास महागला

या दरवाढीमुळे रत्नागिरी विभागातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे दर लक्षणीयरीत्या वाढले आहेत. रत्नागिरी ते मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना आता ६२ रुपये अधिक द्यावे लागतील, तर बोरिवलीसाठी ६५ रुपये आणि पुणे प्रवासासाठी ५७ रुपये जादा मोजावे लागतील. लांजा येथून अक्कलकोटसाठी ५० रुपये आणि धाराशिवसाठी ५५ ते ६० रुपयांनी तिकीट महागले आहे. गुहागर-मुंबई, दापोली पुणे आणि संगमेश्वर-मुंबई या मार्गांवरही ३६ ते ६५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

प्रवासी संघटनांची नाराजी  

दिलासादायक बाब म्हणजे निमआराम, शयनयान आणि शिवशाही बसच्या दरांमध्ये केवळ दोन रुपयांची नाममात्र वाढ करण्यात आली आहे. महामंडळाच्या या निर्णयावर विविध राजकीय पक्षांनी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, सर्वसामान्यांच्या प्रवासावर गदा येत असल्याची टीका होत आहे. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडलेले असताना, आता सरकारी बसचा प्रवासही महागल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा : दादा शब्दाचे पक्के तर कामाचे एक्के होते, दादांच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतोय; बारामतीकरांना सुनेत्रा पवारांसमोर अश्रू अनावर

स्वच्छता अधिभारही लागू

केवळ भाडेवाढच नाही, तर आता स्वच्छतेचा भारही प्रवाशांच्या पदरी पडणार आहे. एसटी बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने स्वच्छता अधिभार लागू केला आहे. १५ एप्रिलपासून प्रत्येक तिकीटधारी प्रवाशाकडून दोन रुपये अतिरिक्त वसूल केले जाणार आहेत. यामुळे प्रत्येक प्रवासागणिक प्रवाशांना मूळ भाड्यापेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागणार आहे.

Web Title: Commuters have expressed displeasure over sts increase in ticket prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • best bus
  • CM Devedra Fadnavis
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.