Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri news : धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

Dapoli Water Crisis : दापोलीतील कोळथरे गावात ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम कारभारामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. धरणात मुबलक पाणी उपलब्ध असूनही पाईपलाईन गळती, दुरुस्तीतील विलंब आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 06:11 PM
धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

Follow Us
Follow Us:
  • दापोलीतील कोळथरे गावात तीव्र पाणीटंचाई
  • पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
  • 15-20 दिवस पाईपलाईन दुरुस्ती नाही
  • कोळथरे ग्रामस्थांना विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे गावात गंभीर पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. यामागे ग्रामपंचायतीचा अकार्यक्षम कारभार, पाईपलाईनमधील गळती, दुरुस्तीतील दिरंगाई आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

दापोली तालुक्यातील कोळथरे गावात ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील तेली वाडी, गुरव वाडी, भुवड वाडी, बोथरे वाडी आणि जोशी वाडीसह अनेक भागांतील नागरिक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवर पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

Shivsena News: जालना जिल्हा परिषद-पंचायत समित्यांवर भगवा फडकवा; डॉ. श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाणी सोडणारे कर्मचारी, पाईपलाईन गळती दुरुस्त करणारे कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. गावाजवळील धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही अनेक वाड्यांमध्ये नियमित पाणी पोहोचत नाही. विशेष म्हणजे, पाईपलाईन फुटल्यानंतर तिची दुरुस्ती 15 ते 20 दिवसांपर्यंत केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील विहिरींमधून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याने महिलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, धरणात पाणी असूनही योग्य व्यवस्थापनाअभावी लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी आहे. यामुळे कोळथरे गावातील पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Motilal Nagar redevelopment: मोतीलाल नगर पुनर्विकासावर नवा वाद; इस्टेटव्ह्यूकडून विकास समितीच्या आरोपांचे खंडन

Web Title: Dapoli kolthare village water crisis gram panchayat negligence ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Dapoli
  • Ratnagiri
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
1

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
2

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती
3

Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.