Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेडपीत मंगळवारी रंगणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; समिती सदस्य निवडीसाठी राजकीय फिल्डिंग जोरात

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी आणि विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेकडे लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2026 | 11:43 AM
झेडपीत मंगळवारी रंगणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; समिती सदस्य निवडीसाठी राजकीय फिल्डिंग जोरात

झेडपीत मंगळवारी रंगणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; समिती सदस्य निवडीसाठी राजकीय फिल्डिंग जोरात

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी आणि विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेकडे लागले आहे. ही निवड केवळ प्रशासकीय औपचारिकता नसून, सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ती खरी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रशासनाने शासनाच्या कठोर निकषांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असून, प्रत्येक सदस्याला किमान एका समितीवर संधी मिळणे बंधनकारक केल्याने अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांच्या आशा आता कमालीच्या पल्लवित झाल्या आहेत. यावेळची संपूर्ण निवड प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अधिक गुंतागुंतीची आणि सामाजिक समतोल साधणारी ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

 

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘स्थायी समिती’ या अत्यंत महत्त्वाच्या समितीमध्ये अध्यक्ष आणि विषय समिती सभापतींसह आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. यात अनुसूचित जाती, जमाती किंवा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित असल्याने राजकीय गणिते अधिक रंजक आणि आव्हानात्मक झाली आहेत. दुसरीकडे, ‘जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती’मध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वावर विशेष भर देण्यात आला असून सहापैकी किमान तीन महिला सदस्य असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमांमुळे अनेक दिग्गजांना आपली वर्णी लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

‘समाजकल्याण’ आणि ‘महिला व बालकल्याण’ लक्षवेधी

या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात लक्षवेधी ठरणार आहेत त्या ‘समाजकल्याण’ आणि ‘महिला व बालकल्याण’ समित्या. समाजकल्याण समितीच्या सभापती पदासाठी मागासवर्गीय प्रवर्गातील सदस्य असणे आवश्यक असून, ९ सदस्यांच्या या समितीत ५ जागा अनुसूचित जाती/जमातीसाठी तर ४ जागा मागास प्रवर्गातील सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महिला व बालकल्याण समितीमध्ये चक्क ७० टक्के आरक्षण महिलांसाठी निश्चित केले असून, ८ पैकी ६ महिला सदस्यांची निवड करणे बंधनकारक आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद सभागृहातील महिला सदस्यांचे राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘एक सदस्य, एक समिती’ चा फॉर्म्युला

प्रशासनाने यावेळी ‘एक सदस्य, एक समिती’चा फॉर्म्युला अत्यंत कडकपणे राबवण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याला किमान एका समितीवर सदस्यत्व मिळणे बंधनकारक केल्यामुळे, यापूर्वी गटतटाच्या राजकारणात डावलल्या गेलेल्या सदस्यांना आता हक्काने मानाचे स्थान मिळणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, वित्त, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवरही ८ ते १० सदस्यांची वर्णी लागणार आहे. या नव्या निकषांमुळे प्रस्थापितांचे वर्चस्व कमी होऊन सर्वसमावेशक निवडी होणार का, की राजकीय नेते यातूनही नवी पळवाट काढणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Everyones attention is on the selection process for standing and subject committee members of ratnagiri zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • maharashtra
  • Ratnagiri
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.