Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पूर्वीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील यांनी तातडीने दुरुस्ती, चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 04:04 PM
टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • टिटवाळ्यात धक्कादायक प्रकार
  • रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये भीती
  • प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
  • तातडीच्या दुरुस्तीची आणि चौकशीची मागणी
Heavy Rain Maharashtra News Marathi : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि पायाभूत सुविधांनाही बसू लागला आहे. अशीच एक घटना कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर दिसून आली असून या मार्गावरील अचानक रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भगदाडामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nashik News : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दुगारवाडी धबधबा, हरिहर गड बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

या घटनेनंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, या रस्त्याची स्थिती धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. तसेच रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही गंभीर घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वेळेत दुरुस्ती झाली असती, तर रस्ता खचण्याची वेळ आली नसती, असेही त्यांनी म्हटले.

चौकशी आणि कारवाईची मागणी

या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मयूर पाटील यांनी केली आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक रस्ते, पूल आणि पावसामुळे कमकुवत झालेल्या भागांची तातडीने तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या मार्गावरून प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

तसेच या मुसळधार पावसामुळे नेतिवली ते मलंगगड रस्ता जलमय झाला आहे. या रस्त्याच्या दूतर्फा मागील 10 वर्षात बेकायदा इमारतींची बांधकामे झाली. त्यामुळे या भागातील नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने पावसाचे पाणी थेट मलंगगड रस्त्यावर येत आहे. आडिवली ढोकळी भागातील स्थानिक राजकीय मंडळी या सर्व प्रकाराला जबाबदार असल्याचे या भागातील रहिवासी सांगत आहे.

Nashik Rain Devendra Fadnavis : उद्या नाशिकसाठी धोक्याचा दिवस? 300 मिमी पावसाचा अंदाज, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Web Title: Titwala ballyani road sinkhole heavy rain traffic safety news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • kalyan
  • maharashtra
  • Monsoon Update

संबंधित बातम्या

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
1

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
2

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
3

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल
4

गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.