
‘मान्सूनची चाहूल’ की काही वेगळे? गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील सोनेरी पाण्याचे रहस्य उलगडले
या संदर्भात सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळी वारे, समुद्रातील उंच लाटा आणि पावसाचे पाणी समुद्रात मिसळल्यामुळे समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर घुसळण होते. या प्रक्रियेमुळे समुद्रातील क्षार, सेंद्रिय घटक आणि इतर नैसर्गिक पदार्थ एकत्र येऊन फेस तयार होतो. त्यामुळे किनाऱ्यावर फेसाळ पाणी दिसणे ही नैसर्गिक घटना आहे. तसेच पुढे सांगितले की, या फेसाळ थराला स्थानिक भाषेत ‘फेणी’ किंवा ‘मान्सूनची चाहूल’ असेही म्हटले जाते. समुद्रातील पाण्याच्या घुसळणीमुळे आणि नैसर्गिक घटकांच्या मिश्रणामुळे काहीवेळा पाण्याला सोनेरी, तपकिरी किंवा गडद रंगाची छटा दिसू शकते.
याशिवाय, मान्सूनपूर्व काळात समुद्राचे पाणी किनाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात ढकलले जात असल्याने अनेक माशांच्या प्रजाती अंडी घालण्यासाठी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे या कालावधीत मच्छीमारांना चांगल्या प्रमाणात मासेमारी होण्याची शक्यता असल्याचा अंदाजही व्यक्त केला जातो. दरम्यान, असगोली किनाऱ्यावर दिसून आलेल्या या अनोख्या दृश्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, समुद्राच्या पाण्यातील या बदलामागील कारणांविषयी विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते हा प्रकार नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असण्याची शक्यता असली तरी याबाबत अधिकृत निरीक्षण आणि तपासणी होणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, या फेसाळ थराला स्थानिक भाषेत ‘फेणी’ किंवा ‘मान्सूनची चाहूल’ असेही संबोधले जाते. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्याच्या सुरुवातीला ही नैसर्गिक घटना अधूनमधून दिसून येते. समुद्रातील सततच्या घुसळणीमुळे पाण्याला काहीवेळा सोनेरी, तपकिरी किंवा गडद रंगाची छटा प्राप्त होते. त्यामुळे हा प्रकार घाबरण्यासारखा नसून, तो निसर्गातील ऋतुबदलाशी संबंधित प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, समुद्राच्या पाण्यातील बदलामुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता वाढली असून, अनेक नागरिक आणि पर्यटक या दुर्मीळ दृश्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तज्ज्ञांनी मात्र अफवांवर विश्वास न ठेवता, हा प्रकार नैसर्गिक असल्याचे सांगितले आहे.