Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरीत खळबळबळ! जयगड पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातबॉम्बचा स्फोट ! महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब हस्तगत…

एका महिलेचा गावठी हातबॉम्बला स्पर्श झाल्याने जोरदार स्फोट.घटनास्थळावरून २९ जिवंत गावठी हातबॉम्ब जप्त करण्यात आले.रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि डीवायएसपी यांनी घटनास्थळी भेट दिली.हे गावठी बॉम्ब कोणी आणि कोणत्या उद्देशाने तिथे ठेवले होते याचा तपास सुरू आहे.

  • By Dilip Bane
Updated On: May 20, 2026 | 03:44 PM
Jaigad crude bomb explosion

Jaigad crude bomb explosion

Follow Us
Follow Us:
  • जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक स्फोटाची घटना घडली.
  • वाटत जांबारी फाटा परिसरात लाकडे गोळा करताना महिलेचा गावठी हातबॉम्बला स्पर्श झाला.
  • स्फोटात सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे गंभीर जखमी झाल्या.
  • त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.
  • घटना सकाळी सुमारे ६.४५ वाजता घडली.
जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाटत जांबारी फाटा येथे आज सकाळी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. मोकळ्या जागेत लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा अज्ञात इसमाने उघड्यावर टाकलेल्या गावठी हातबॉम्बशी संपर्क आल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटात महिला गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब जप्त केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाकडे गोळा करताना काळाचा घाला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७ वर्षे, रा. वाटत खंडाळा, जांबारी फाटा) या सकाळी ०६.४५ वाजण्याच्या सुमारास जांभळी फाटा येथील ‘भूत बंगला’ परिसराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बांबूची लाकडे जमा करण्यासाठी गेल्या होत्या. लाकूड तोडत असताना, त्या जागेवर कोणीतरी अज्ञात इसमाने उघड्यावर टाकलेल्या गावठी हातबॉम्बला त्यांचा अचानक हात लागला. हात लागताच बॉम्बचा जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात सौ. रेश्मा सुर्वे यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.​घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. या पथकांच्या मदतीने घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यात आला असता, तिथे आणखी तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब मिळून आले. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

Chhatrapati Sambhajinagar Crime: खाऊचं पाकीट हातात अन् मृतदेह खड्ड्यात; संभाजीनगरातील घटना अंगावर शहारे आणणारी

​वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट व तपास

घटनेची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरीचे मा. अप्पर पोलीस अधीक्षक आणि मा. डी.वाय.एस.पी. श्री. माईनकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

Nagpur Crime: ‘मला वाचवा…’ म्हणत आईला फोन, काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह कबरीतून काढले बाहेर आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: जयगडमध्ये नेमकी काय घटना घडली?

    Ans: जयगड परिसरातील जांबारी फाटा येथे लाकडे गोळा करताना एका महिलेचा गावठी हातबॉम्बला स्पर्श झाल्याने जोरदार स्फोट झाला.

  • Que: या स्फोटात कोण जखमी झाले?

    Ans: सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Web Title: Jaigad explosion shock woman seriously injured in blast while collecting wood 29 live crude bombs seized in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Maharashtra Crime
  • maharashtra news
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश
3

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.