काय घडलं तिच्यासोबत नेमकं?
फाजीला जबीन शेख (मूळ अमरावती) हिचा विवाह याच वर्षी जानेवारी महिन्यात नागपूरच्या बोरिया पुरा परिसरातील जुबेर शेख याच्यासोबत. सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित होतं. मात्र काही दिवसांनी हुंड्याच्या मागणीवरून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
Police Attack Tasgaon: तासगावात पोलिसांवर दगडफेक! मंदिर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पथकावर हल्ला
14 मे रोजी फाजीला ने आईला फोन करून रडत रडत ‘मला वाचवा… माझ्यासोबत काहीही होऊ शकतं’ असं सांगितले होते. यानंतर काही वेळातच तिचा फोन बंद झाला. त्यानंतर काही वेळात सासरच्या मंडळींकडून फाजिलाचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती देण्यात आली. फाजीलाची आई वडील नागपुरात पोहोचले. सुरुवातीला सासरच्यांनी मृतदेह देण्यास नकार दिला असा आरोप करण्यात आलाय. मात्र नंतर मृतदेह अमरावती येथे देण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान घालत असताना फाजीलाच्या गळ्यावर जखमेचे निशाण दिसून आले. त्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा संशय माहेरच्यांना आला.
फाजीलाचा भाऊ मोहम्मद आवेश अब्दुल हसन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर मुतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात गळ्यात आपल्याने मृत्यू झाल्याचे पुष्टी झाली आहे. त्या आधारे नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 238, 351 (2), आणि 3(5) या अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पती जुबेर शेख दीर मोहम्मद इरफान आणि सासरे जलील शेख यांना आरोपी करण्यात आले आहे. तर पोलिसांनी पती आणि दिराला ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात. आणि वृद्धापकाळमुळे सासऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. लग्नानंतर महिलांवर होणारा मानसिक आणि शारीरिक अत्याचार किती भीषण रूप धारण करू शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Jaigad Bomb Blast: जयगड परिसरात गावठी हातबॉम्बचा स्फोट; महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब जप्त
Ans: पोस्टमार्टम अहवालानुसार तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला.
Ans: सासरच्यांनी फाजीलाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचा दावा केला होता.
Ans: पोलिसांनी पती जुबेर शेख, दीर मोहम्मद इरफान यांना ताब्यात घेतले असून सासऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.






