Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम

Sindhudurg News : सिंधुदुर्गात देशातील पहिल्या सबमरीन पर्यटन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, पर्यटकांना समुद्रतळावरील जैवविविधता जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 11:42 AM
पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम

Follow Us
Follow Us:
  • देशातील पहिल्या सबमरीन पर्यटन प्रकल्पाच्या उभारणीला वेग आला आहे.
  • पर्यटकांना समुद्राखालचे जग जवळून पाहण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.
  • हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
देशातील पहिल्या पाणबुडी पर्यटन प्रकल्पाला माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उभारला जाणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२७अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. युद्धनौका व पाणबुड्यांच्या निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव असलेली एमडीएल आता पर्यटकांसाठी २४ आसनी सबमरीनसह संपूर्ण तांत्रिक प्रणाली विकसित करीत आहे.

Ratnagiri News : 19 मित्रांची ट्रिप अन् घात…! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती

‘ट्रिटॉन डीपव्यू-२४’च्या धर्तीवर तयार होणाऱ्या या अत्याधुनिक पाणबुडीला विशेष अॅक्रेलिक प्रेशर हल व पॅनोरॅमिक व्हाइंग डोम असेल. समुद्रात उतरल्यावर काचा अदृश्य झाल्याचा भास होईल आणि पर्यटकांना ३६० अंशातून सागरी विश्व न्याहाळता येईल. रंगीबेरंगी प्रवाळ, विविध मासे, सागरी वनस्पती व ‘एक्स-आयएनएस गुलदार’ भोवती विकसित होणाऱ्या कृत्रिम प्रवाळभित्तींचा थरार या सफरीत अनुभवता येणार आहे. सव सामान्य पयटकांना समुद्रतळाशी जाऊन जैवविविधता पाहण्याची संधी प्रथमच मिळणार आहे.

तब्बल १४ तास समुद्रात राहण्याची क्षमता

पूर्णपणे बॅटरीवर चालणारी ही पाणबुडी शून्य कार्बन उत्सर्जन करणारी आहे. २४० किलोवॅट-तास क्षमतेची बॅटरी, दोन २० किलोवॅटचे मुख्य भ्रस्टर्स, चार सहाय्यक भ्रस्टर्स, ऑक्सिजन पुरवता, कार्बन डायऑक्साइड शोषण यंत्रणा व आपत्कालीन ऊर्जा व्यवस्था यामुळे ती सुसज्ज असेल. सलग १४ तास समुद्रात कार्यरत राहण्याची क्षमता असून जॉयस्टिक, टचस्क्रीन व मॅन्युअल नियंत्रणाची सोय आहे. वातानुकूलित कैबिन व कमी आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनाही हा अनुभव सुरक्षितपणे घेता येईल.

पाणबुडीची संपूर्ण इकोसिस्टम

एमडीएलकडून केवळ सबमरीनची निर्मितीच नव्हे, तर तिच्या सुरक्षित आणि अखंड संचालनासाठी आवश्यक असलेली सपूर्ण इकोसिस्टम उभारण्याचे कामही सुरू आहे. यामध्ये चार्जिंग सुविधा, डॉकिंग स्टेशन, नियंत्रण कक्ष, देखभाल केंद्र, संप्रेषण प्रणाली, बॅटरी व्यवस्थापन यंत्रणा आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचा समावेश आहे.
समुद्रातील बदलत्या हवामानाचा आणि भरती-ओहोटीचा विचार करून आंतरराष्ट्रीय सुरक्षामानकांनुसार या सुविधा विकसित केल्या जात आहेत.

Ratnagiri News: रत्नागिरीच्या किनारपट्टी विकासासाठी ८५.८४ कोटी! पायाभूत सुविधांचा कायापालट

‘मेक इन इंडिया’ला नवी दिशा

पर्यटनासाठीच्या अशा पाणबुड्या आतापर्यंत आयात केल्या जात होत्या. स्कोर्पिन वर्गातील पाणबुड्यांच्या निर्मितीतील अनुभवाच्या बळावर एमडीएल ही क्षमता देशात विकसित करीत आहे. संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान पर्यटनात वापरण्याचा हा पहिलाच प्रयत्न ‘मेक इन इंडिया’ला नवी दिशा देणारा ठरणार असून, सिंधुदुर्ग हे देशातील पहिले सबमरीन पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mazagon dock building indias first 24 seater tourist submarine for sindhudurg underwater tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Make in India
  • NAVARASHTRA
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
1

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!
2

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद
3

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
4

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.