Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: कातळशिल्प संवर्धन आणि पर्यटनाला वेग! रत्नागिरीसाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा

uday Samant: बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हयातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन अधिका-यांना आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 02:48 PM
रत्नागिरी कातळशिल्प

रत्नागिरी कातळशिल्प

Follow Us
Follow Us:
  • कातळशिल्पांसाठी १४ कोटींचा आराखडा
  • पालकमंत्री उदय सामंतांच्या आढावा बैठकीत सूचना
  • संगणकीय सादरीकरणाद्वारे कामकाजाची माहिती
रत्नागिरी/Uday Samant: रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी कातळशिल्प संवर्धन व विकासासाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीचा निधी पूर्णपणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच वापरला गेला पाहिजे. सर्व विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांच्या याद्या तातडीने अंतिम कराव्यात, निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करून नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरूवात होईल याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आडावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हयातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन अधिका-यांना आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कातळशिल्पाच्या आराखड्यासाठी पुरातत्व विभागाने जिल्हाधिका-यांपुढे सादरीकरण करून तातडीने मान्यता घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. याशिवाय गणपतीपुळे, आरे-वारे, नेवरे, माडवी व भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सुसज्ज फूडस्टॉल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारात जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडी बांधकामासाठी सर्व शाळांचे सर्वेक्षण केले जाईल. सामाजिक व इतर उपक्रमांतर्गत ‘शुभमंगल सामूहिक नौदणीकृत विवाह योजना’ प्रभावीपणे राबवून यावर्षी जिल्ह्यात किमान ५० जोडप्यांचे ५ सामूहिक विवाह आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी महिला व बालविकास आणि समाज कल्याण विभागाने संयुक्तपणे पुढाकार घ्यावा.

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…

पोलीस विभागाच्या श्वान पथकासाठी वातानुकूलित वाहन उपलब्ध करून दिले जाईल, तसेच भविष्यातील १५ श्वानांची क्षमता विचारात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा, या बैठकीत जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषध खरेदी, खैराच्या रोपांचे वाटप आणि शासकीय इमारतीच्या बांधकामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

Web Title: Minister uday samnat take meeting for development of katal shilpa tourism planning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • ratnagiri news
  • Tourism news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…
1

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…

युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी; शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळां’चा विस्तार
2

युवा पर्यटन धोरणातून तरुणांना पर्यटन क्षेत्रात संधी; शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘युवा पर्यटन मंडळां’चा विस्तार

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश
3

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास
4

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.