Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…

Ratnagiri: मतदार यादीतील विविध दुरुस्त्यांसाठी निवडणूक आयोगाने तीन महत्वाचे नमुने (फॉर्म) निश्चित केले असून ते नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, नवीन मतदाराना आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६ भरावा लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 01:51 PM
Ratnagiri SIR

Ratnagiri SIR

Follow Us
Follow Us:
  • SIR मधून १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली
  • पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अर्जाची होणार छाननी
  • दावे व हरकती नोंदवण्याची संधी
रत्नागिरी: जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या प्रक्रियेत १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची नावे वगळण्यात भारत आली आहेत. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत १ ऑक्टोबर २०२६ हा दिनांक धरून ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्याची महत्त्वाची जबाबदारी जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. जर कोणाचे नाव यादीतून वगळले गेले असेल, तर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची संधी प्रशासनाने दिली आहे. यानंतर सर्व अर्जाची छाननी करून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रारूप मतदार यादी नागरिकांच्या सोयीसाठी सर्वत्र उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पदनिर्देशित ठिकाणी ही यादी पाहता येईल.

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश

याशिवाय ज्या मतदारांना प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, त्यांना ऑनलाईन पद्धतीनेही आपले नाव यादीत शोधण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरबसल्या किंवा जवळच्या केंद्रावर जाऊन नावाची खात्री करून घ्यावी, या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन आपले नाव नोंदवून घ्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाचे तीन महत्तवाचे नमुने

मतदार यादीतील विविध दुरुस्त्यांसाठी निवडणूक आयोगाने तीन महत्वाचे नमुने (फॉर्म) निश्चित केले असून ते नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, नवीन मतदाराना आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६ भरावा लागणार आहे. मतदार यादीतील एखाद्या नावावर आक्षेप घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ ची सोय करण्यात आली आहे.

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…

तसेच नावातील दुरुस्ती, फोटो बदलणे किंवा पत्ता बदलण्यासाठी नमुना क्र. ८ भरून द्यावा लागेल. नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी हे अर्ज सादर करून आपल्या मतदानाचा अधिकार सुरक्षित करावा, वेळेत अर्ज सादर केल्यास अंतिम यादीत नाव समाविष्ट करणे सहज शक्य होणार आहे. जिल्ह्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्यामुळे मतदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Ratnagiri sir process 131000 voters names removed voters list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • ratnagiri news
  • SIR
  • Voter List

संबंधित बातम्या

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह
1

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश
2

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
3

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
4

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.