Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Chiplun Elections 2026: चिपळूणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निकालाच्या तोंडावर पक्षात मोठा भूकंप झाला आहे. खरं तर चिपळूणमधील कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या राजीनामा दिल्याने धक्का बसला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 16, 2026 | 11:20 AM
Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, 'या' नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, 'या' नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Follow Us
Close
Follow Us:
  • निकालाच्या तोंडावर चिपळूणमध्ये धक्का!
  • शिवसेना ठाकरे गटाचे समीर टाकळे यांचा राजीनामा
  • निवडणूक निकालाच्या उंबरठ्यावरच ठाकरे गटात फूट
चिपळूणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले नेते समीर टाकळे यांनी पक्षाची साथ सोडली आहे. समीर टाकळे यांचा राजीनामा पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. खरं तर सर्वत्र मतमोजणी सुरु असून निकालाकडे लोकांचे लक्ष लागले आहे. मात्र अशातच समीर टाकळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चिपळूणमधील चक्र फिरली आहेत. पक्षाचे माजी उपशहरप्रमुख, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक व शहरातील प्रभावी नेते समीर टाकळे यांनी निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. याशिवाय राजीनामा देताना त्यांनी असं देखील स्पष्ट केलं आहे की, ते शिवसेना (ठाकरे गट) पक्षाशी यापुढे कोणताही संबंध ठेवणार नाही.

BMC Election Result 2026: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच महायुतीचे मोठे यश! 67 उमेदवारांची बिनविरोध निवड, वाचा यादी

चिपळूणमध्ये समीर टाकळे यांच्या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चिपळूणमधील कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक अशी टाकळे कुटुंबाची ओळख होती. मात्र आता याच निष्ठावंत कुटूंबाने पक्षाची साथ सोडल्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. चिपळूण शहर व तालुक्यामध्ये ठाकरेंची शिवसेना उभी करण्यामागे टाकळे कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख बंधू टाकळे हे याच कुटुंबातील होते. असं असताना अचानक काय झालं की, समीर टाकळे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाशी कोणताही संबंध ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले, याची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

NMC Election Result 2026: निकाल जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का! या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

टाकळे कुटूंबाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. टाकळे कुटूंब शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यांनी पक्ष आणखी वाढवण्यासाठी आणि चिपळूण शहर व तालुक्यामध्ये पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काम सुरु केलं होतं. मात्र आता अचानक समीर टाकळे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

काही दिवसांपूर्वी समीर टाकळे यांच्या सुकन्या, युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनी पदासह पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे समीर टाकळे यांचा राजीनामा पक्षासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. समीर टाकळे यांनी घेतलेल्या राजीनामाच्या निर्णयाबाबत अद्याप ठाकरे गटाने कोणतीही प्रतिक्रिया जाहीर केली नाही. तसेच ठाकरेंच्या शिवसनेचा राजीनामा दिल्यानंतर समीर टाकळे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Web Title: Municipal elections result 2026 before result senior chiplun leader samir takale resigns big shake up for thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Chiplun
  • Municipal Election Result 2026
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
1

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Shimga Festival: कोकणवासींयासाठी खुशखबर! शिमगोत्सवासाठी धावणार ‘ही’ स्पेशल मेमू Train
2

Shimga Festival: कोकणवासींयासाठी खुशखबर! शिमगोत्सवासाठी धावणार ‘ही’ स्पेशल मेमू Train

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…
3

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.