Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक

Jaitapur: राजापूर रिअॅक्टर अन् स्थानिक विरोध हे कमी की काय म्हणून आता राजापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पासाठीचे रिअॅक्टर देशातच बनविले जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात या प्रकल्पांविरुद्ध वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 05, 2026 | 06:22 PM
jaitapur Nuclear Plant Project

jaitapur Nuclear Plant Project

Follow Us
Follow Us:
  • जैतापूर अणुऊर्जा, कोकणात पुन्हा रणकंदन
  • ४ प्रस्तावित प्रकल्पामुळे आता जनतेच्या विरोधाची धार तीव्र 
  • नवी दिल्लीत पार पडली उच्चस्तरीय बैठक
Jaitapur/Ratnagiri: गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळापासून काम सुरू असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला अद्यापही सुरू होण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध असतानाही विरोध जुगारून हा प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू झाली होती. मात्र १५ वषपिक्षा जास्त काळ लोटला तरीही हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. आता त्यातच भर म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ४ अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

यामुळे जिल्हावासीयांच्या विरोधाला आणखी कडक धार आली असून संपूर्ण परिसरात संतापाचा उद्रेक झाला आहे. या दापोली आणि राजापुरातून जनआंदोलनाची सुरुवात झाली आहे. हे प्रकल्प केवळ प्रस्तावित आहेत आणि त्यांना अजून मंजुरी मिळालेली नाही, असे नेहमीचे उत्तर शासन स्तरावरून दिले जात आहे.

जुवे जैतापूर ग्रामपंचायत १२ वेळा विनविरोध, शासनाचे दुर्लक्ष तर ५४ वर्षांपासून नागरिकांना मागावी लागतेय रस्त्यासाठी भीक

राजापूर रिअॅक्टर अन् स्थानिक विरोध हे कमी की काय म्हणून आता राजापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पासाठीचे रिअॅक्टर देशातच बनविले जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात या प्रकल्पांविरुद्ध वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. जैतापूर येथील प्रस्तावित ९.६ गिगावॉट (९,६०० मेगावॉट) क्षमतेचा हा प्रकल्प जगातील सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी एक मानला जातो. यामध्ये १६५० मेगावॉट क्षमतेचे एकूण ६ युरोपियन प्रेशराइज्ड रिअॅक्टर्स उभारण्याचे नियोजन आहे. फ्रान्सची कंपनी या प्रकल्पासाठी मुख्य तंत्रज्ञान पुरवठादार आणि कंत्राटदार म्हणून काम करत आहे.

नवी दिल्लीत झाली उच्चस्तरीय बैठक! 
स्थानिक जनतेचा विरोध तीव्र होत असतानाच आता या तंत्रज्ञानाचे सुटे भाग भारतात तयार होणार असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील नागरी अणुऊर्जा सहकार्याला पुन्हा एकदा गती देण्यासाठी नुकतीच नवी दिल्ली येथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरशन ऑफ इंडिया आणि फ्रान्सची ‘इलेक्ट्रसिटी डी फ्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत युरोपियन रिअॅक्टर्ससाठी लागणारे सुटे भाग, अभियांत्रिकी साहित्य आणि विविध उपकरणे बेट भारतातच तयार करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

खाजगी सहभाग; नवीन नियमावली
दरम्यान भारतीय पुरवठादारांना मोठी संधी मिळेल असा दावा केला जात असला, तरी स्थानिक स्तरावर मात्र यामुळे प्रकल्प कायमचा लादला जाईल अशी शक्यता वर्तवून विरोध दर्शवला जात आहे. भारताच्या ऊर्जा मंत्रालयाने नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी आणि परदेशी भागीदारांचा सहभाग सुलभ करण्यासाठी नव्या नियमावलीच्या चौकटीची तयारी सुरू केली आहे. यामुळे परवाना देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास सरकार व्यक्त करत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जैतापूरसारख्या प्रलंबित आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील कायदेशीर, आर्थिक व तांत्रिक अडचणी दूर होऊन कामाला गती मिळेल असे सांगितले जात आहे. मात्र, खाजगी क्षेत्राचा प्रवेश आणि नियमावलीतील शिथिलता यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतील अशी शंका आंदोलकांकडून आणि स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केली जात आहे.

Web Title: Public opposition intensifies in ratnagiri district due to four additional proposed projects jaitapur nuclear projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • environment
  • Konkan News
  • Ratnagiri
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri Crime: कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला, पण परतलाच नाही! वालोपेत टपरीमागे तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
1

Ratnagiri Crime: कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला, पण परतलाच नाही! वालोपेत टपरीमागे तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Cricket News: MPL मध्ये दोन वेळा चॅम्पियन, आता क्रिकेटपटू घडवणार! ‘रत्नागिरी जेट्स’ संघाने थेट…
2

Cricket News: MPL मध्ये दोन वेळा चॅम्पियन, आता क्रिकेटपटू घडवणार! ‘रत्नागिरी जेट्स’ संघाने थेट…

Ratnagiri: व्यापाऱ्यांनो चिंता करू नका! रस्ता रुंदीकरणात कोणाचेही नुकसान नको; उदय सामंतांच्या सूचना
3

Ratnagiri: व्यापाऱ्यांनो चिंता करू नका! रस्ता रुंदीकरणात कोणाचेही नुकसान नको; उदय सामंतांच्या सूचना

Tarali Pumped Storage Project: भीमाशंकरच्या जंगलानंतर तारळी खोऱ्यावर अदानीची नजर; शेती अन् पाणी वाचवण्यासाठी स्थानिकांचा एल्गार!
4

Tarali Pumped Storage Project: भीमाशंकरच्या जंगलानंतर तारळी खोऱ्यावर अदानीची नजर; शेती अन् पाणी वाचवण्यासाठी स्थानिकांचा एल्गार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.