Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : गुरांच्या धडकेत गाडी पलटी झाली अन्… ; मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहराच्या हद्दीत, कुकुटपालन कुंभारवाडीजवळ मोकाट गुरांच्या बेधडक वावरामुळे शुक्रवारी मध्यरात्री २.२० वाजता भीषण अपघात झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 19, 2025 | 12:58 PM
Ratnagiri News : गुरांच्या धडकेत गाडी पलटी झाली अन्… ; मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात मध्यरात्री भीषण अपघात
  • गुरांच्या धडकेत गाडी पलटी झाली अन्…
  • मोकाट गुरांच्या वावराने अपघाताचं वाढतं प्रमाण
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहराच्या हद्दीत, कुकुटपालन कुंभारवाडीजवळ मोकाट गुरांच्या बेधडक वावरामुळे शुक्रवारी मध्यरात्री २.२० वाजता भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एक चारचाकी गाडी रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या गुरांना धडकून त्याच ठिकाणी पलटी झाली. सुदैवाने गाडीतील चौघे प्रवासी पूर्णपणे सुखरूप बचावले असले तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, धडकेत एका गायीसह एका पाड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मोकाट गुरांमुळे होणाऱ्या या वाढत्या अपघातांवर आता नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच लांजा नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्यासह पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी कुंभारवाडीतील तरुणांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी असीम पाटणकर, पंढरीनाथ मायशेट्ये, हेमंत कुंभार, आरिफ चिकली, रोशन कुंभार, दुर्गेश मायशेट्ये, अमित समगीस्कर, यश शिंदे, ज्ञानेश्वर मायशेट्ये, दानिश पालकर, शकील खान, अमर कुंभार, हासन दसुरकर, सिराज दसुरकर या स्थानिक तरुणांनी मदतीसाठी मोलाची भूमिका बजावली.

महायुती सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला करणार राज्यभर पिठलं भाकर आंदोलन

लांजा शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वावर असतो. मध्यरात्री महामार्गावर ही जनावरे बसलेली असल्याने अशा प्रकारचे जीवघेणे अपघात वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिक श्री. अरबाज जी. नेवरेकर हे नगरपंचायत प्रशासनाकडे मोकाट गुरांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी यासाठी निवेदन देणार आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने त्वरित या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

पुणे महापालिका आयुक्त अ‍ॅक्शन माेडवर, सहायक आयुक्तांंची तातडीने केली बदली; नेमकं कारण काय?

 

Web Title: Ratnagiri news car overturned after being hit by cattle and terrible accident on mumbai goa highway at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Accident
  • Marathi News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: वाह मुलांनो, शाब्बास! खाऊच्या पैश्यातून वन्यप्राण्यांसाठी पाणी; जातेगावच्या भाऊ बहिणीचा उपक्रम
1

Ahilyanagar News: वाह मुलांनो, शाब्बास! खाऊच्या पैश्यातून वन्यप्राण्यांसाठी पाणी; जातेगावच्या भाऊ बहिणीचा उपक्रम

Ratnagiri News : गुणवत्ता घसरल्याने देवगडची हापूसची मागणी घटली
2

Ratnagiri News : गुणवत्ता घसरल्याने देवगडची हापूसची मागणी घटली

Crime News: रत्नागिरीत नेमके काय चाललंय? मिऱ्या-नागपूर हायवेवर Hit & Run घटनेत…
3

Crime News: रत्नागिरीत नेमके काय चाललंय? मिऱ्या-नागपूर हायवेवर Hit & Run घटनेत…

खळबळजनक! अल्पवयीन मुलाने चिमूरडीला फूस लावली अन् घरात नेल्यावर…; कुठे घडली घटना?
4

खळबळजनक! अल्पवयीन मुलाने चिमूरडीला फूस लावली अन् घरात नेल्यावर…; कुठे घडली घटना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.