
Ratnagiri News
कोकणच्या अर्थव्यवस्थेला आणि परकीय चलनास मोठा हातभार लावणारा हापूस आंबा पिक २००९ मधील ‘फयान’ वादळानंतर सतत संकटांच्या मालिकेत अडकला आहे. दरवर्षी है मुख्य पीक कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपतीमध्ये सापडून उद्ध्वस्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षी मुबलक फुलौरा येऊनही कडाक्याच्या मंांडीमुळे मोहर काळा पडला होता, तर यदा मात्र एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस अत्यंत कमी झाला. यामुळे रत्नागिरीसह ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. हवामानात इतकी प्रचंड विषमता निर्माण झाली आहे की. अवघ्या तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळे व विचित्र बाताबरण पाहायला मिळत आहे.
Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ
नवीन पालवीवर ‘तुडतुड्या’ किडीचा प्रचंड प्रादुर्भाव
या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच मार्च में २०२६ च्या हंगामात देखील अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा आणि तुडतुड्या रोगामुळे हापूसचे उत्पादन सुमारे ८० टक्के ते ९० टक्के पर्यंत घटले होते. आता पुन्हा एकदा कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे सलग दुसऱ्यांदा पुढील हंगामावर म्हणजेच २०२७ व्या सुरुवातीला येणाऱ्या पिकावर मोठे संकट ओढवले आहे, सध्या बागांमधील परिस्थिती पाहता, गतवर्षी ज्या झाडांना मोहर आला होता तिथे नवीन पालवी फुटली आहे, तर मौहर न आलेली झाडे हिरवीगार दिसत आहेत. मात्र, या नवीन पालवीवर ‘तुडतुड्या’ किडीचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
महागड्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी सुरू
तुडतुड्या किडीपासून घालवी वाचवण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी करावी लागत असून खर्चाचा मोठा भार वाढला आहे. ऑक्टोबर हीट नंतर वेळेत आणि पुरेशी चंही सुरू झाली तरच या झाडांना योग्य प्रकारे फुलोरा येण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तवली जात आहे. परंतु यंदा थतीचा कालावधी कमी राहण्याचा आणि तापमान जास्त राहण्याचा अंदाज असल्याने हापूसच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. जमिनीतील पाण्याचे दुर्भिक्ष आणि उष्णतेमुळे लागलेला मोहर गळून पडण्याची दाट भीती निर्माण झाली असून बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.