Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यामध्ये ७८ सज्ञान महिला आणि १५ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यापैकी ८८ महिला-मुलींचा शोध लागून त्य परत आल्या आहेत, तर सात प्रकरणे अद्या बाकी आहेत. विशेष म्हणजे, उपलब्ध माहितीनुसार बहुतांश प्रकरणांमध्ये प्रेमसंबंध अथवा प्रेमविवाहाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही आकडेवारी केवळ पोलिसांच्या नोंदवहीपुरती मर्यादित न राहता बदलत्या सामाजिक परिस्थितीचा गंभीर संकेत देणारी ठरत आहे. ही केवळ पोलिसांची आकडेवारी असून बहुतांशी प्रकरण पोलीस स्टेशन बाहेरच सामाजिक सलोख्याने गुंडाळली जात असल्याने पोलीस ठाण्यात त्यांची नोंद नसल्याने प्रकरणे अजून वाढू शकतात.
या आकडेवारीतील सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे १७ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी १६ मुलींचा शोध लागला असला, तरी अल्पवयीन मुली घरातून निघून जाण्याच्या घटना गंभीरपणे घेण्याची गरज आहे. किशोरवयातील भावनिक आकर्षण, प्रेमसंबंध, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, पालकांशी संवादाचा अभाव तसेच कुटुंबातील दुरावा यांसारख्या विविध कारणांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
Jalgaon News: डोळ्यांदेखत फळबागा करपल्या; बोदवडच्या शेतकऱ्यांना …
निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नऊ महिन्यांत २७सज्ञान महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी २४ महिलांचा शोध लागला आहे. तर ५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून या सर्व पाचही मुली परत आल्या आहेत.
रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० सज्ञान महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी २९ महिला परत आल्या आहेत. याशिवाय ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ५ मुलींचा शोध लागला आहे. सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ सज्ञान महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी १९ महिला परत आल्या आहेत. तसेच ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. या सर्व सहाही मुलींचा शोध घेण्यात आला आहे.
Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत …
बेपत्ता झालेल्या महिला-मुलींच्या प्रकरणाचा तपास करताना बहुतांश प्रकरणांमध्ये प्रेमसंबंध किंवा प्रेमविवाहाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिला व मुलींनी कुटुंबीयाना न सांगता आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही आढळते. मात्र, प्रत्येक बेपत्ता प्रकरणामागे प्रेमसंबंध किंवा प्रेमविवाहच कारण आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही, प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून नेमके कारण समोर आणणे आवश्यक आहे.






