Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; महाराजस्व समाधान शिबिर

महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून प्रलंबित समस्या सोडविणे हा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 09, 2026 | 08:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल…

वाशिम तालुक्यातील अनसिंग तसेच मंगरुळपीर तालुक्यातील आगरगाव येथे शनिवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये प्रत्येक महसूल मंडळात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यात सर्व ठिकाणी या अभियानाचा एकाच दिवशी शुभारंभ करण्यात आला. नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यातील शुभारंभाच्या दिवशी विविध महसूल प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये फेरफार २६५, ७/१२ दुरुस्ती १५०, जिल्हा सातबारा ४५६, ६-बी उतारे ४५४, विविध प्रमाणपत्रे ८८८ तसेच फेरफार नोंदी व्यवस्थापनांतर्गत ३४२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. महसूल विभागाकडून नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, या अभियानामुळे प्रलंबित महसूल प्रकरणांच्या निकाली काढण्यास गती मिळणार आहे. नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व उतारे सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि शासनाच्या सेवांचा लाभ घ्यावा.

Pune News: इराण-इस्रायल युद्धामुळे पुणे महानगरपालिकेला धक्का, १८ गॅस स्मशानभूमी बंद, पीएमसीचे आवाहन 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालम युग, उपविभागीय अधिकारी अमोल देवकर, तसेच सर्व तहसीलदारांना विशेष निर्देश देण्यात आले. गाव दप्तर अद्ययावत ठेवण्यासह प्रलंबित प्रकरणे कमी करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने हे अभियान १५ मार्चपर्यंत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.

Web Title: Reach out to the citizens with government schemes district collectors statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Buldhana
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : अधिकार तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे! न्या. अनिल किलोर यांचे प्रतिपादन; अमडापूर येथे महामेळावा
1

Buldhana News : अधिकार तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे! न्या. अनिल किलोर यांचे प्रतिपादन; अमडापूर येथे महामेळावा

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून
2

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.