Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भ्रष्टाचारी कार्यपद्धती न अवलंबता ते प्रस्ताव रद्द करा; भाजपची प्रशासकांकडे मागणी

सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पूरक कार्यपद्धती अवलंबू नये. प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर आपण संबंधित प्रस्ताव नामंजूर करावेत अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्त - प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2022 | 09:29 PM
भ्रष्टाचारी कार्यपद्धती न अवलंबता ते प्रस्ताव रद्द करा; भाजपची प्रशासकांकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपताना स्थायी समितीने मंजुरी न देता राखून ठेवलेल्या १२३ प्रस्तावांवर भाजप लक्ष ठेऊन आहे. पालिकेचा कार्यकाळ संपल्याने हे प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी प्रशासकांवर असणार आहे. मात्र महिना उलटला तरी यातील बहुतांशी प्रस्ताव मंजुरीविना आहेत. यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पूरक कार्यपद्धती अवलंबू नये. प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर आपण संबंधित प्रस्ताव नामंजूर करावेत अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्त – प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे. तसे पत्र भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिले आहे.

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्चला संपल्याने राज्य शासनाने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पालिकेचा सर्व कार्यभार प्रशासकांकडून चालवला जातो आहे. पालिकेची मुदत संपताना स्थायी समितीत १२३ प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार प्रशासकांचे असणार आहेत. मात्र यातील बहुतांशी प्रस्ताव महिना उलटला तरी मंजूर करण्यात आलेले आहे. याकडे भाजपने लक्ष वेधले असून भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी चहल यांना पत्र दिले आहे. त्यात निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे महापालिका बरखास्त झाली आहे. महापालिका संपुष्टात आल्याने यापूर्वीच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आलेले काही प्रस्ताव विचारात घेतलेले नाही, असे एकूण १२३ प्रस्ताव होते. सदरचे प्रस्ताव मंजूर करणे हे आता प्रशासकाच्या अखत्यारित आहेत. आपण यावर ठोस निर्णय घेताना दिसला नाही. भाजपने नालेसफाईच्या कामांबाबत तीव्र टीका केल्यानंतर आपण २५ दिवसांनी नालेसफाई आणि चर बुजवण्याच्या कामांचे प्रस्ताव समंत केले असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

[read_also content=”एसटी कर्मचाऱ्यांना दोष देता येणार नाही, त्यांना भडकवलं; घरासमोरील आंदोलनावर शरद पवारांचं वक्तव्य https://www.navarashtra.com/maharashtra/st-employees-cannot-be-blamed-provoked-them-sharad-pawars-statement-on-agitation-in-front-of-house-nrdm-267208.html”]

तर ते प्रस्ताव रद्द करावेत –

गेल्या बुधवारी ६ एप्रिल २०२२ रोजी आठ प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे समजते. स्थायी समितीत बोलणी फिसकटलेले प्रस्ताव आपण निवडक पद्घतीने मंजूर करत आहात. त्यामुळे आपल्यावर दबाव तर नाही ना अशी आमची धारणा होत आहे. काही निवडक प्रस्तावांनाच आपण मान्यता देत आहेत. आपल्याला प्रलंबित १२३ प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर आपण ते प्रस्ताव नामंजूर करावेत. पंरतु निवडक प्रस्तावांना मान्यता देऊन मागील सत्ताधा-यांना भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Reject the proposal without resorting to corrupt practices bjps demand to administrators nr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2022 | 09:27 PM

Topics:  

  • C M Uddhav Thackeray
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • mumbai mahapalika
  • shivsena

संबंधित बातम्या

Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी
1

Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी

Prakash Mahajan : “युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली”, प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका
2

Prakash Mahajan : “युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली”, प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
3

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.