Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: रेसकोर्सवरील वृक्षतोडीचा अहवाल दडपला! किती झाडे तोडली याबाबत महानगरपालिका अनभिज्ञ; विकासकाला ‘अल्टिमेटम’

जी/दक्षिण' विभागाअंतर्गत येणाऱ्या रेसकोर्सवरील या बांधकामात बाधित होणारी एकूण २५ झाडे हटवण्याचा मसुदा सहा महिन्यांपूर्वी वृक्ष प्राधिकरणाने मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे सादर केला होता. पण त्याआधीच कंपनीने वृक्षतोड करून त्याचा अहवाल दडपल्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला असून पर्यावरणाप्रेमीकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2026 | 11:30 AM
रेसकोर्सवरील वृक्षतोडीचा अहवाल दडपला! किती झाडे तोडली याबाबत महानगरपालिका अनभिज्ञ; विकासकाला 'अल्टिमेटम'

रेसकोर्सवरील वृक्षतोडीचा अहवाल दडपला! किती झाडे तोडली याबाबत महानगरपालिका अनभिज्ञ; विकासकाला 'अल्टिमेटम'

Follow Us
Follow Us:

महालक्ष्मी रेसकोर्स येथील ‘रेस कोर्स मिनी क्लब हाऊस’च्या प्रस्तावित बांधकामासाठी विकासकाने तब्बल सहा महिन्यांपूर्वीच झाडे तोडली असून, त्याचा अधिकृत अहवाल वृक्ष प्राधिकरण समितीपासून दडपून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिका प्रशासनाला आणि नियमांना न जुमानता सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे पालिकेचा उद्यान विभागही सध्या अंधारात चाचपडत आहे. या प्रकरणी संबंधित विकासक कंपनीला पालिकेने आता अंतिम ‘अल्टिमेटम’ दिला असून, त्यानंतरही दाद न मिळाल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Maharashtra Weather Update : वादळ वारा अन् विजा…! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट

पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला संताप व्यक्त

‘जी/दक्षिण’ विभागाअंतर्गत येणाऱ्या रेसकोर्सवरील या बांधकामात बाधित होणारी एकूण २५ झाडे हटवण्याचा मसुदा सहा महिन्यांपूर्वी वृक्ष प्राधिकरणाने मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र, प्रत्यक्षात मंजुरी प्रक्रियेदरम्यानच कंपनीने आधीच वृक्षतोड करून त्याचा अहवाल दडपल्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला असून पर्यावरणाप्रेमीकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम सुरू असलेल्या जागेवर नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ६ महिन्यांपूर्वी झाडे तोडूनही कंपनीने वृक्ष प्राधिकरणाच्या मागण्यांना अद्याप दाद दिलेली नाही.

या प्रकल्पासाठी २५ झाडे तोडण्यास 66 मजुरी देण्यास सहा महिन्यांपूर्वी झाडे तोडल्यानंतर त्याचा अहवाल देणे बंधनकारक होते. आम्ही हा अहवाल वारंवार मागितला आहे, मात्र त्यांनी तो अद्याप दिलेला नाही. त्यामुळे आम्ही लवकरच त्यांना पुन्हा एकदा पत्र लिहून अंतिम ‘अल्टिमेटम’ देणार आहोत. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास कायद्यानुसार योग्य ती पुढील कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती दशरथ घुले, सहाय्यक उद्यान अधिकारी यांनी दिली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्ससारख्या संवेदनशील जागेवर ६ महिन्यांपूर्वीच झाडे तोडून त्याचा अहवाल दडपून ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. केवळ ‘अल्टिमेटम’ची पत्रे पाठवून वेळकाढूपणा करू नये. पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित कंपनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दिला आहे.

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

१,२३२ नवीन झाडे लावण्याचे बंधन:

कंपनीला २५ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र कंपनीने नेमकी कोणती आणि किती झाडे तोडली, नियमानुसार नवीन झाडे लावली का? याची कोणतीही अधिकृत माहिती उद्यान विभागाकडे नाही. पालिका प्रशासनाचा वचक नसल्यानेच विकासक एवढे धाडस करत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरील बांधकामासाठी ‘आरडब्ल्यूआयटीसी’ आणि ‘आकार आर्किटेक्ट्स’ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, तेथील ६८ झाडांपैकी ४३ झाडे सुरक्षित ठेवून उर्वरित २५ झाडांवर कारवाई केली जाणार आहे, ज्यामध्ये १२ झाडांचे पुनर्रोपण तर १३ झाडे कापली जातील. १९७५ च्या वृक्ष जतन अधिनियमानुसार या बदल्यात विकासकाला रेसकोर्सच्या मोकळ्या जागेत १,२३२ नवीन झाडे लावणे बंधनकारक असून, त्यांनी तसे लेखी हमीपत्रही दिले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Report on tree felling at the racecourse suppressed municipal corporation unaware of the number of trees cut mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • Mumbai News
  • tree cutting

संबंधित बातम्या

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत
1

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?
2

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?

Godrej Block Launch: गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच; भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’
3

Godrej Block Launch: गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच; भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती
4

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.