Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar News: ‘सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, मग नेत्यांचे कुठे जातात?’ रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना खोचक सवाल

रोहित पवार यांनी डी-लिमिटेशन कायद्यावरही सरकारवर जोरदार निशाणा . हा कायदा जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकार तुमचे असताना भाजपच मुंबईत आंदोलन करत आहे,

  • By anuradha sagar
Updated On: Apr 22, 2026 | 11:22 AM
शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; रोहित पवारांची मागणी

शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; रोहित पवारांची मागणी

Follow Us
Follow Us:

Rohit Pawar Criticized Mahayuti Government :  “राज्यात भोंदूगिरीला राजकीय पाठबळ मिळत असून त्यामुळेच अशा प्रकारची प्रकरणे वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. “महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून ते कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे,” अशा खरमरीत शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार Rohit Pawar यांनी सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यात दिवसेंदिवस धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात भोंदूगिरीला खतपाणी मिळाले आहे. “एखादा भोंदू बाबा शून्यातून सुरुवात करून दोन हजार कोटींचा मालक होतो, हे सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, प्रतिगामी आणि मनुवादी विचारसरणीमुळे भोंदूगिरी वाढीस लागली असून सरकारकडून अशा प्रवृत्तींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल,

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी धक्कादायक बाब मांडली. या प्रकरणात सुमारे ७० अधिकारी आणि महिलांचे व्हिडिओ असल्याचे समोर आले असल्याचा दावा त्यांनी केला. “सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, पण नेत्यांचे व्हिडिओ कुठे जातात?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

डी-लिमिटेशन कायद्यावरही टीका

रोहित पवार यांनी डी-लिमिटेशन कायद्यावरही सरकारवर जोरदार निशाणा . हा कायदा जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकार तुमचे असताना भाजपच मुंबईत आंदोलन करत आहे, ही विचित्र परिस्थिती आहे,” असे ते म्हणाले. या आंदोलनामुळे मुंबईतील नागरिकांना दोन-दोन तास अडचणींना सामोरे जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.

उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी

“आंदोलन करायचे असेल, तर शेतकऱ्यांसाठी करा. राज्यात शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, वरून आदेश आल्याशिवाय आंदोलन केले जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजप कार्यकाळ आणि भोंदूगिरीवर आरोप

भाजपच्या विचारसरणीत भोंदूगिरी करणाऱ्यांना पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. बलात्कार प्रकरणात तुरुंगात गेलेल्या Asaram Bapu यांना काही लोक समर्थन देतात. याउलट, भागवत संप्रदाय पुढे नेणाऱ्या संत-महाराजांना अपेक्षित समर्थन मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “पाच-पाच कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रात येणारे काही महाराज Sant Tukaram महाराजांबद्दल चुकीचे बोलतात, तरीही कोणी प्रतिक्रिया देत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात भोंदूगिरीला प्रोत्साहन देत वारकरी संप्रदाय कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

 

 

 

Web Title: Rohit pawar slams mahayuti over bhondugiri alleges political support for nashik fraudster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Maharashtra Political News
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
1

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Pune MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’
2

Pune MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’

Raj Thackeray on Ganeshotsav 2026: ‘गणेशोत्सवात दंगल घडवणार…’ राज ठाकरेंच्या दाव्याने उंचवलेल्या सर्वांच्या भुवय्या
3

Raj Thackeray on Ganeshotsav 2026: ‘गणेशोत्सवात दंगल घडवणार…’ राज ठाकरेंच्या दाव्याने उंचवलेल्या सर्वांच्या भुवय्या

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
4

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.