Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024; लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 25 हजार महिलांची पोलीस भरती; एकनाथ शिंदेंच्या नव्या घोषणा

आजच्या सभेने महाराष्ट्रातल्या इतिहासतला नवा अध्याय लिहीला जाणार आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा कोल्हापुरात होत आहे.  आज प्रचाराचा नारळ फोडलाय पण 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथे आल्याशिवाय राहणार नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 05, 2024 | 10:24 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर:   “आजच्या सभेने महाराष्ट्रातल्या इतिहासतला नवा अध्याय लिहीला जाणार आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा कोल्हापुरात होत आहे.  आज प्रचाराचा नारळ फोडलाय पण 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथे आल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा जाहीरनाम्यातील 10 कलमे आहेत. पण हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, म्हणून आपला सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध करूच.असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  कोल्हापुरातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपय देण्याचं आम्ही जाहीर करतो. महिला सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलीस भरती कऱण्याचा निर्णय़ घेणार आहोत. शेतकरी आपला अन्नदाता आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्याचा आहे. म्हणून आमची दुसरी योजना आहे कर्जमाफी.  शेतकरी सन्मान योजना यात राज्य सरकारचे सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार आहेत त्यातही वाढ करून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.  एमएसपी वर 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कुणीही उपाशी झोपणार नाही. राज्यात प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन आम्ही देत आहोत. महाराष्ट्रात कुणी भुकेला राहू नये अशी आमची भावना भावना आहे. वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये मदत निधी देण्याची आमची योजना आहे.जीवानावश्यक वस्तुचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याच आश्वासन आम्ही देत आहोत. शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. राज्यातील ग्रामीण भागात रस्ते बांधण्याचा निर्णय़ घेतला आहे.

हेही वाचा: धूम्रपान सोडायचा विचार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स

आपल्या महायुती सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. लेक लखपती योजना, पण लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोणीतही न्यायालयात गेले पण त्यांना न्यायालयाने फटकारले. आधी म्हणाले 1500 रुपये भीक देताय का पण माझ्या लाडक्या बहिणींबद्दल बोलण्यापूर्वी तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सांगितलं आहे. आता मीही सांगतो कुणाचाही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. वाढत जाईल हे आम्ही म्हणत होतो,  ती आज आम्ही पूर्ण करणार आहोत.  तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर तुम्हाला देताना सरकारही मागेपुढे पाहणार नाही.

आज राज्यात देशात डबल इंजिनचं सरकार आहे. इतर लोक दिल्लील  जातात ते मलाच मुख्यमंत्री करा असं सांगण्यासाठी. पण आम्ही जातो ते निधी आणण्यासाठी, रस्त्यांसाठी, रेल्वेंसाठी अनेक योजनांसाठी. म्हणून डबल इंजिन डबल गॅरंटी. त्यामुळे आम्हाला तिकडे जाण्यात कमीपणा वाटत नाही. या राज्याच्या विकासासाठी आम्ही पैसे मागत आहोत. आज मराठवाडा वॉटर ग्रीड असो, वा कोल्हापूरच्या पंचगंगेचा महापूर बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला मदत करणार आहेत. मग का नाही जायचं आम्ही. आम्ही तुमच्यासारखं लोटांगण घालायला जात नाही. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवरही ताशेरे ओढले.

हेही वाचा:  वारी एनर्जीजच्या शेअरचा 11 दिवसात धमाका, गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक रिटर्न, शेअर पोहोचला 3500 रुपयांवर

Web Title: Rs 2100 for beloved sisters 25 thousand women recruited in police eknath shindes new announcements nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 10:10 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • kolhapur
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
2

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
3

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
4

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.